the various types of cocktail how to prepare the simple steps in kolhapur 
फूड

कॉकटेल आवडतं ना? मग नक्की ट्राय करा श्रीलंकन पद्धतीचे कॉकटेल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कॉकॉटेल एक मद्य पेय म्हणून ओळखलं जातं. लोक अनेक शतकांपासून वेगवेगळी पेयं एकत्र करतात त्यालाच कॉकटेल म्हटलं जातं. खरंतर कॉकटेलबाबत अनेक मतभेद आहेत. दोन वेगवेगळ्या प्रकारची मद्य पेयं एकानंतर एक प्यायलं की ते कॉकटेल होतं. जर व्हीस्किनंतर व्होडका किंवा इतर काही. मात्र एवढंच खरं नाही. 

कॉकटेल एक किंवा त्यापेक्षा जास्त अल्कोहलसह इतर पेय पदार्थांपासून तयार होते. यामध्ये फळांचा रस, एरिटेड बेवरेज, क्रीम आणि इतर पदार्थांचा समावेश असतो. एकापेक्षा अधिक अल्कोहोलिक पेय असतील तर त्याला कॉकटेल म्हटलं जातं. जगातील वेगवेगळ्या भागात लोक त्यांच्या आवडीनुसार कॉकटेल ट्राय करतात. खास पार्ट्यांमध्ये याचा वापर सर्वाधिक होतो. कॉकटेलमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आणि इतर पदार्थांचा समावेश असल्यानं यामुळे डिहायड्रेशन आणि हँगओव्हरचं प्रमाण अल्कोहोलच्या तुलनेत कमी असतं. 

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कॉकटेल ट्राय करू शकता. ते अल्कोहोलिकच असलं पाहिजे असं काही नाही. यामध्ये गल पॉल कॉकटेल आणि अच्चारु कॉकटेल ही दोन श्रीलंकन कॉकटेल ट्राय करता येतील. 

गल पॉल कॉकटेल
50 मिली कोकोनट अर्क
25 मिली सॅअसाप
1 टीस्पून पॅशन फ्रूट प्यूरी + एक्स्ट्रा फ़ॉर गार्निश
कॉकटेल तयार करण्यासाठी सर्व साहित्य आणि प्यूरी ग्लासमध्ये टाकून मिक्स करा. त्यानंतर 5 मिलि पॅशन फ्रूट प्यूरीने गार्निश केल्यानंतर सर्व्ह करा.

अच्चारू कॉकटेल
50 मिली टकिला
10 ग्रॅम अंब्रेला
10 ग्रॅम सॉल्टेड रॉ मँगो
10 ग्रॅम पायनापल
1 टीस्पून चिली फ्लॅक्स (चवीनुसार)
1 टीस्पून ब्लॅक पेपर (चवीनुसार)
 आइसक्यूब

टकिला, अंब्रेला, सॉल्टेड रॉ मँगो आणि पायनापल एकत्र करून घ्या. यानंतर शेकरमध्ये टकिला मिक्श्चर, चिली फ्लॅक्स आणि ब्लॅक पेपर घाला. शेवटी आइसक्यूब घालून चांगल्या पद्धतीने मिक्स करा आणि सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT