Vat Purnima Special Upvas Breakfast Recipe | Ratalyache Chaat sakal
फूड

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासाला योग्य असे उकडलेल्या रताळ्याचे हेल्दी चाट! लगेच नोट करा रेसिपी

Healthy and Tangy Sweet Potato Dish for Fasting: वट पौर्णिमेनिमित्त झटपट, चवदार आणि आरोग्यदायी रताळा चाट बनवा. उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी परिपूर्ण अशी ही रेसिपी चव आणि पौष्टिकतेचा सुंदर मिलाफ आहे. नक्की करून पाहा!

Anushka Tapshalkar

Best Breakfast Idea for Vat Purnima Fast: उपवास म्हटलं की लगेच मनात साबुदाणा, बटाट्याची भाजी किंवा फोडणीची पोहे अशा नेहमीच्या पदार्थांची यादी तयार होते. पण यावेळी काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचंय ना? मग ही खास रेसिपी नक्की ट्राय करा ,चटपटीत रताळ्याचं चाट! ही डिश फक्त स्वादिष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. रताळ्याचे पौष्टिक गुण, शेंगदाण्याची कुरकुरीत चव आणि चाट मसाल्याचा झणझणीत टच. लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी.

साहित्य

  • रताळे (Sweet Potato) – २ मध्यम आकाराची (उकडून सोललेली)

  • चाट मसाला

  • लिंबाचा रस – १-२ टेबलस्पून

  • सैंधव मीठ – चवीनुसार

  • तूप

  • शेंगदाणे – भाजलेले

  • जिरे पावडर – चिमूटभर

  • डाळिंब

कृती

  • सर्वप्रथम रताळे उकडून सोलून मध्यम चौकोनी तुकड्यांमध्ये कापा.

  • एका मोठ्या बाऊलमध्ये हे तुकडे ठेवा.

  • गॅसवर कढई गरम करून त्यात तूप टाका.

  • त्यात रताळ्याचे तुकडे टाकून मध्यम आचेवर हलके शॅलो फ्राय करा.

  • फ्राय झाल्यावर ते पुन्हा बाऊलमध्ये काढा.

  • त्यात भरड कुटलेले शेंगदाणे, सैंधव मीठ, जिरे पावडर, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून छान एकत्र मिसळा.

  • आता तयार चाट एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढा, त्यावर डाळिंबाचे तुकडे टाका.

  • गरमागरम आणि झणझणीत चाट लगेच खाण्यासाठी सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी पनीर कचोरी, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2025

Satara News: 'धरणग्रस्त आजीला सात वर्षांनंतर न्याय'; ‘मराठवाडी’तील प्रश्न प्रशासनाने सोडविला, देय रक्कम देण्याबाबत कार्यवाही

अग्रलेख : संतुलित निवाडा

SCROLL FOR NEXT