Veg Keema Matar sakal
फूड

घरच्या घरी बनवा Veg Keema Matar; येईल हाॅटेलसारखी चव

सकाळ डिजिटल टीम

गृहिणींना रोज पोळी- भाजी ही बनवावीच लागते. मराठी फॅमीलीत तर रोज पोळी-भाजी वरण, बनवलेच जाते. पण रोज तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजी काय बनवावी हे सूचत नसेल अशावेळी घरच्या घरी हाॅटेल सारखी बनवा व्हेज खिमा मटर. ही एक स्वादिष्ट डिनर पार्टी डिश आहे. ती तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या साहित्याच्या मदतीने तयार करु शकता. भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. तर चला जाणून घेऊया व्हेज खिमा मटर रेसिपी.

साहित्य

फ्लाॅवरचे तुकडे, फ्रेन्च बीन्स (बारीक कापलेले), मशरुम, गाजर, हिरवी मटर (उकडलेले), टोमॅटो,कांदा, हिरवी मिरची , अद्रक-लसूण पेस्ट, काळी इलायची, दालचिनी,धने पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर,सूर्यफुल तेल,पाणी, चवीनुसार मीठ.

तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या साहित्याच्या मदतीने तयार करु शकता. भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता.

कृती

पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात काळी इलायची आणि दालचीनी टाका. कापलेला कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत भाजा. अद्रक-लसूण पेस्ट टाका. सर्व मसाले पावडर टाका. पूर्ण मिश्रणाला तेल वेगळे होईपर्यंत भाजा. उकडलेले हिरवी मटर सोडून सर्व भाज्या टाका. त्यात पाणी आणि मीठ टाका. सर्व भाज्या चांगल्या प्रकारे उकडेपर्यंत झाकून ठेवा. मिश्रण कोरडे व्हायला हवे. त्यात ओलावा नसावा. आता हिरवी मटर टाका. व्हेज खिम्याला कोथिंबीरीने सजवून रोटी, फुलका, नान किंवा ब्रेडबरोबर खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT