Vegan Kabab Recipe esakal
फूड

Vegan Kabab Recipe : वेट लॉसदरम्यान नाश्त्यासाठी हेल्दी रेसिपी शोधताय? मग ही रेसिपी ठरेल बेस्ट

तुम्हीही वेट नियंत्रणात ठेवणारी नाश्ता रेसिपी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Vegan Kabab Recipe : वेट लॉस दरम्यान लोक डाएटकडे विशेष लक्ष देतात. वजन न वाढता हेल्दी नाश्ता आणि जेवण कसं प्लान करता येईल याकडे डायटिंग करणाऱ्यांचं विशेष लक्ष असतं. तेव्हा तुम्हीही वेट नियंत्रणात ठेवणारी नाश्ता रेसिपी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

आज आपण नाश्त्यासाठी व्हिगन कबाबची रेसिपी बघणार आहोत. कबाबमध्ये भरपूर प्रोटिन्स आणि कार्ब्स असतात, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. प्रोरोटीनयुक्त आणि कमी कॅलरी असलेले हे व्हीगन कबाब बनवण्याची रेसिपी येथे जाणून घेऊया.

कबाबसाठी लागणारे साहित्य

रताळे - १

बटाट - १

मोड आलेले हिरवे मूग - 1/2 कप

कोथिंबीर - बारीक चिरून

कांदा - 1 टीस्पून बारीक चिरून

आलं - अर्धा टीस्पून पेस्ट

मीठ - चवीनुसार

मसाला - आवडीनुसार

व्हीगन कबाब रेसिपी

प्रथम बटाटे आणि रताळे उकळवा. त्यांना सोलून एका भांड्यात चांगले मॅश करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवा मूग, कांदा, कोथिंबीर टाका. तसेच आले आणि लसूण पेस्ट, मीठ, मसाला, लाल तिखट घालून मिक्स करा. याला टिक्कीचा आकार देऊन प्लेटमध्ये ठेवा. आकार देण्यासाठी तुम्हाला कॉर्नफ्लोअर, बेसन किंवा मैदा यासारख्या इतर कोणत्याही घटकांची गरज भासणार नाही. (Breakfast)

त्यानंतर गॅसवर तवा गरम करा. त्यात तेल किंवा बटर घाला. एकाच वेळी ३-४ टिक्की भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. गरमागरम कबाब शेंगदाणे किंवा हिरवी चटणी, टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा. तुम्ही ते नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून खाऊ शकता. (Healthy Recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT