meggi paratha google
फूड

मॅगी खाता! त्याचा परोठा खाल का! व्हायरल होतोय व्हिडिओ

इंदूरमधील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने हा मॅगी परांठा तयार केला आहे

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर दर आठड्याला चित्र-विचित्र पदार्थ बनविण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ढोकळा आईस्क्रीमनंतर (Ice Cream)आता मॅगी परोठोचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. इंदूरमधील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने हा मॅगी परांठा तयार केला आहे. साहजिकच अल्पावधीतच तो व्हायरल झाला आहे. (Weired Food Viral Video)

हा व्हायरल झालेला व्हिडिओ फूड ब्लॉगर प्रशांत विजयवर्गीय यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर आरजे रोहनने तो पुन्हा शेअर केला. मॅगी पराठा बनवण्यासाठी आधी त्या विक्रेत्याने एका पातेल्यात लोणी टाकले. नंतर त्यात काही भाज्या आणि मसाले टाकले आणि थोडावेळ परतले. पुढे त्याने पाणी, नूडल्स आणि मसाला घालून साधी मॅगी तयार केली. नंतर त्याने शिजवलेली मॅगी परांठ्याच्या कणकेत भरली. त्यानंतर त्या विक्रेत्याने पराठा लाटून तो तव्यावर सोनेरी-तपकिरी रंगाचा होईपर्यंत भाजला. त्यावर थोडे चीज किसून तो खायला दिला. त्याने या पराठ्यासोबत लोणचं, कांदा, रायता, भाजी करी आणि हिरवी चटणी सर्व्हिंगसाठी दिली. या व्हिडीओला आतापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. नेटिझन्सनी या प्रयोगाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (Weired Food Viral Video)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT