Matan Khima Samosa Esakal
फूड

Weekend Special Recipe : खमंग मटण खिमा समोसा कसा तयार करायचा?

समोसा हा एक प्रसिद्ध असा पदार्थ आहे.

सकाळ डिजिटल टीम

समोसा हा एक प्रसिद्ध असा पदार्थ आहे. मैद्याच्या आत भरपूर बटाटे आणि इतर प्रकारचे मसाले भरून समोसा तळून तयार केला जातो. जर तुम्हाला हटके स्टाईलने समोसे तयार करायचे असेल तर आज ही खास रेसिपी तुमच्याकरताच आहे.

चला तर मग जाणुन घेऊ या खमंग मटण खिमा समोसा कसा बनवायचा याची खास रेसिपी.. 

साहित्य

● एक पाव स्मॅश केलेले मटण

● तेल

● सात ते आठ रेडिमेड समोसा शीट

चार बारीक चिरलेले कांदे

● दोन चमचे चिरलेल्या हिरव्या मिरच्या

● बारीक चिरलेली कोथिंबीर

● एक चमचा गरम मसाला पावडर

● धणे पूड

● हळद

● आले लसुण पेस्ट

● मिरची पावडर

 ● मीठ

कृती

सर्व प्रथम एक कढई घ्यावी. कढईत थोडे तेल टाका, आता ते गरम करा. यानंतर गरम तेलात दोन चमचे लसूण आलं पेस्ट,थोडी लाल तिखट, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, गरम मसाला, दोन चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, हे सर्व साहित्य एकत्र करा. आता त्यात एक पाव मटणाचा खिमा टाका आणि  हे सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने चांगले मिसळा. आता हे सर्व साहित्य मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटे चांगले शिजवून घ्या. आता त्यात तीन ते चार बारीक चिरलेले कांदे घालून मिक्स करा.

आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. हे सर्व मिश्रण त्यात असलेले पाणी कोरडे होईपर्यंत शिजवावे लागेल. आता हे मिश्रण थोडं थंड होऊ द्या. यानंतर समोसा पत्ती घ्या आणि हाताच्या मदतीने शंकूच्या आकारात बनवा. आता त्यात तयार फिलिंग भरा आणि वरून कोन बंद करा. बंद करण्यापूर्वी, शंकूच्या वरच्या भागात थोडे कोरडे पीठ आणि पाणी लावा. जेणेकरुन शंकूचा वरचा भाग चांगला चिकटून राहतो आणि आतले मिश्रण बाहेर येण्याची भीती नाही.

आता कढईत तेल टाकावे तेल घालून चांगले गरम करावे. तेल पूर्णपणे गरम झाल्यावर त्यात समोसे टाकून तळून घ्या. समोसे हलके तपकिरी होईपर्यंत तळायचे आहेत. तुमचा मटण खिमा समोसा तयार. हा समोसा तुम्ही सॉससोबत सर्व्ह करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT