food sakAL
फूड

काय आहेत चवळीचे फायदे ; वाचा सविस्तर

चवळी जगातील बहुतेक सर्व देशांत खाल्ली जाते.

मृणाल तुळपुळे

चवळी ही एक शेंग भाजी असून, कोवळ्या शेंगा मोडून त्याची भाजी केली जाते. या शेंगांतील दाणे भरले, की त्या सोलून ओल्या दाण्यांची उसळ केली जाते, तर वाळलेल्या चवळीचे दाणे कडधान्य म्हणून वापरले जातात. हे दाणे गोलसर, टपोरे आणि पांढरट रंगाचे असतात. बारीक आकाराच्या गावरान चवळीला उत्तम चव असते, तर हायब्रीड चवळीचा दाणा खूप मोठा असतो.

चवळी जगातील बहुतेक सर्व देशांत खाल्ली जाते. चवळीच्या दाण्यावर एका बाजूला काळ्या डोळ्यासारखी खूण असते, त्यामुळे चवळीला ‘ब्लॅक आईड पी’ असे म्हटले जाते. युरोपमध्ये व अरब देशांत हे कडधान्य खूप वापरतात. तिथे त्यापासून सॅलड, सूप, कटलेट असे पदार्थ बनवले जातात. ‘फलाफल’ हा प्रसिद्ध इजिप्शियन पदार्थ चवळीपासून बनवलेला असतो. आपल्याकडे चवळी भिजवून तिला मोड आणून उसळ, आमटी, भात असे पदार्थ केले जातात.

चवळीचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. वजन कमी करण्यासाठीदेखील चवळी खाणे योग्य ठरते. उकडलेली चवळी अथवा चवळीची उसळ खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले रहाते. चवळीत भरपूर प्रमाणात सोल्युबल फायबर्स असल्यामुळे पचनशक्ती सुधारते; तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी चवळी खाल्यास पोट साफ होते. चवळी मधुमेहावर अतिशय गुणकारी आहे. त्यात असलेली प्रथिने रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करण्यास मदत करतात व शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात.

हे कडधान्य गरोदर स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक आहे. गरोदरपणात होणारी कॅल्शियमची झीज व लोहाची कमतरता चवळीच्या सेवनामुळे भरून निघते, पोटातील बाळाची चांगली वाढ होऊन प्रसूतीनंतर मातेला दूध येण्यास मदत होते. चवळीतील या गुणधर्मामुळे आहारतज्ज्ञांच्या मते आपल्या आहारात तिचा जास्तीत जास्त वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT