Sour Taste Sakal
फूड

Secret of Taste : लिंबू किंवा चिंच खाल्ल्यावर आपोआप डोळे का मिटतात?

गोड किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर असे होत नाही, आंबट पदार्थ खातानाच असं का होतं?

वैष्णवी कारंजकर

तुम्ही लिंबू किंवा चिंच खाल्ली असेलच आणि ते खाल्ल्याबरोबर लोकांच्या चेहऱ्यावर एक खास प्रतिक्रिया येते हेही पाहिलं असेल. बर्‍याचदा आपण आपले डोळे बंद करतो, तोंड आकसतो आणि ओठ दाबतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, गोड किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर असे होत नाही, आंबट पदार्थ खातानाच असं का होतं?

आंबट पदार्थांमध्ये भरपूर ऍसिड असतं, ज्यामुळे आपण अशा प्रतिक्रिया देतो. लिंबू, व्हिनेगर आणि कच्च्या फळांचा आपल्या जिभेला स्पर्श होताच, आपल्या मेंदूला सिग्नल जातो की आपण काहीतरी आंबट खाल्लं आहे. या सर्व प्रतिक्रियांमधून आपलं शरीर आपल्याला एक प्रकारे इशारा देते.

आपल्या जिभेमध्ये छोटे सेन्सर्स असतात, ज्यांना टेस्ट बड्स म्हणतात. हे टेस्ट बड्स तुम्हाला सांगतात की तुम्ही खात असलेले अन्न गोड, खारट, कडू किंवा आंबट आहे. जेव्हा अन्न, लाळेसह, या टेस्ट बड्सला स्पर्श करते तेव्हा ते आपल्या मेंदूला अन्नाची चव कशी आहे हे सांगतात. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण आंबट खातो तेव्हा आपला चेहरा आकसतो कारण अन्नाची चव तीव्र आणि आम्लयुक्त असते. (Food News)

जेव्हा आपण आंबट खातो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया आपोआप येते. सर्वच आंबट पदार्थ आपल्यासाठी हानिकारक नसतात, परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला आजारी करू शकतात. म्हणजे खराब झालेलं दूध किंवा कच्ची फळं. डोळे मिटणं हे कदाचित आपल्या शरीरातून एक प्रकारचं सिग्नल आहे की हे अन्न आपल्याला आजारी देखील बनवू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT