GREEN TOMATO CHUTNEY Esakal
फूड

Winter Recipe: हिवाळ्यात चवदार लागणारी हिरव्या टोमॅटो चटणी कशी तयार करायची?

वजन कमी करायचे असल्यास आहारात रोज टोमॅटोचा समावेश करावा.

सकाळ डिजिटल टीम

GREEN TOMATO CHUTNEY: टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कर्बोदकांचे प्रमाण हे अत्यंत कमी असते. त्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या आजारांमध्ये टोमॅटोचं सेवन गुणकारी ठरतं. वजन कमी करायचे असल्यास आहारात रोज टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. आजच्या लेखात आपण हिरव्या टोमॅटो चटणी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

दोन हिरवे टोमॅटो

दोन ते तीन हिरव्या मिरच्या 

दोन चमचे भाजलेले तीळ

दोन चमचे भाजलेले शेंगदाणे

दोन चमचे भाजलेले सुके खोबरे

लसुण पाकळ्या 

कोथिंबीर

चवीप्रमाणे मीठ

गूळ

तेल

जिरे 

हळद

कृती:

टोमॅटो स्वच्छ धुवुन उभे पातळ कापून घ्यावेत. एका कढईत तेल तापवून त्यात जिरे आणि हळद घालावी. जीरे थोडे तडतडले की त्यात टोमॅटो घालून परतावे. सतत हलवत रहावे. तोंएटोला सुटलेले पाणी पूर्ण आटले पाहीजे आणि टोमॅटो नीट शिजेल अशे भाजले गेले पाहीजे. कदाचीत काही फोडी करपण्याची शक्यता आहे. तसे झाले तरी हरकत नाही. आता हे भाजलेले टोमॅटो थोडे थंड होऊ द्यावेत. मीठ, मिरची, तीळ, दाणे, खोबरे, कोथिंबीर आणि गूळ एकत्र करुन भरड वाटावे. आता त्यातच टोमॅटो घालून नीट बारीक करून घ्यावे. अशारितीने तुमची हिरव्या टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. तुम्ही ही चटणी भाकरी किंवा पोळी सोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT