Pavta amati Esakal
फूड

Winter Recipe: असंख्य आजारावर रामबाण उपाय असलेल्या पावट्याची आमटी कशी करतात?

भूक कमी लागणे, अपचन होणे यासारख्या विकार असलेल्या लोकांनी तर आवश्यक पावटा खावा.

दिपाली सुसर

Pavta amati: हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार रंगाच्या पावट्याच्या शेंगा दिसू लागतात. खरं तर पावटा अनेकांना आवडत नाही. त्यामुळे काही गृहिणीदेखील ही भाजी करण्यास टाळाटाळ करतात. परंतु, पावटा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात पोटदुखीपासून ते कानदुखीपर्यंत अनेक आजारांवर पावटा गुणकारी असल्याचं पाहायला मिळतं.आम्लपित्ताच्या त्रासामुळे पोटात जळजळ होत असेल तर पावट्याच्या शेंगाचा काढा पिल्याने आराम मिळतो. अनेकदा स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो अशावेळी पावटा किंवा पावट्याच्या शेंगाचा काढा बहुउपयोगी ठरतो.भूक कमी लागणे, अपचन होणे यासारख्या विकार असलेल्या लोकांनी तर आवश्यक पावटा खावा.

साहित्य

● एक कप सोललेला पावटा

● दोन कांदे (एक फोडणीसाठी)

● एक टाॅमेटो

● ओल्या खोबऱ्याचे काप

● दोन हिरव्या मिरच्या

● एक चमचा आले लसूण पेस्ट

● एक चमचा लाल तिखट

● अर्धा चमचा गरम मसाला

● हळद

● हिंग

● जीरे

● मोहरी

● तेल

● चवीनुसार मीठ

कृती:

सर्वप्रथम पावटा सोलून, धुवून घ्यावा. नंतर कांदा,टाॅमेटो,कोथिंबीर कापून घ्यावे. हिरवी मिरची, लसूण, आले पेस्ट करून घ्यावी.मिक्सरच्या भांड्यात पहिले खोबऱ्याचे काप घालून बारीक वाटून घ्या आता त्यात एक कांदा, टाॅमेटो घालून बारीक वाटून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी फुलले की बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर,वाटप केलेली हिरवी मिरची लसूण आले ची पेस्ट घालून परतून घ्यावे.आता पावटा घालून चांगले परतून घ्यावे. खोबरे कांदा टाॅमेटो चे वाटण घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

सुके मसाले घालून एक मिनिट परतून घ्यावे. पाणी घालून मिक्स करा व एक उकळी आल्यावर गॅस बारीक करुन झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्यावे.अशा पध्दतीने आपली झणझणीत पावट्याची आमटी तयार आहे. ही आमटी तुम्ही चपाती, भाकरी,भातासोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT