Chandan Batwa Bhaji Esakal
फूड

Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्याला पौष्टिक असणारी चंदन बटवा भाजी कशी तयार करायची?

चंदनबटव्याची पालेभाजी थंडीच्या दिवसांमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chandan Batwa Bhaji: चंदनबटवा ही हिरवी पालेभाजी गुणकारी मानली गेली आहे. या भाजीमध्ये अ जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फोरस, आणि पोटॅशियम मुबलक मात्रेमध्ये आहेत. या पालेभाजीमध्ये लोह आणि फायबरही आहे. चंदनबटव्याची पालेभाजी थंडीच्या दिवसांमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. या पालेभाजीच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. आजच्या लेखात आपण हिवाळ्यात आरोग्याला पौष्टिक असणारी चंदन बटवा भाजी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

1) दोन जुडी चंदन बटव्याची भाजी 

2) एक वाटी घट्ट दही

3) अर्धा चमचा साखर

4) चवीनुसार मीठ

5) एक मोठा चमचा दाण्याचा कूट

6) एक चमचा आलं व मिरचीचे वाटण

7) कोथिंबीर 

8) तेल

9) जीरे 

10) मोहरी 

11) चिमूटभर हिंग 

12) एक चमचा तीळ

13) कढीपत्त्याची पाने

14) चिमूटभर हळद

15) अर्धा चमचा तिखट

कृती:

सर्वप्रथम भाजी निट निसुन घेऊन त्यांची पानं स्वच्छ धुऊन त्याला बारीक कापावं व स्टीमर मध्ये चाळणीमध्ये वरती पंधरा मिनिटे वाफवून घ्यावी.मग वाफवलेल्या भाजीमध्ये दाण्याचा कूट मिरचीचं वाटण, कोथिंबीर,साखर मीठ,हळद,तिखट व दही घालून एकजीव करावे.छोट्या कढल्यामध्ये तेल घालून ते गरम झालं की त्यामध्ये हिंग मोहरी जिरं तीळ व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी व ती वरील भाजीमध्ये घालावी व एकजीव करावे ही भाजी खूप टेस्टी होते ही चपाती बरोबर भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT