Winter Recipe Esakal
फूड

Winter Recipe : हिवाळ्यात पारंपरिक पध्दतीने हरभऱ्याची भाजी कशी तयार करायची?

हरभऱ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅलशियम असते. यामुळे हाडे आणि मसल्स मजबूत होतात.

सकाळ डिजिटल टीम

Harbhara bhaji: हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. मात्र, ही भाजी आपल्याकडे जास्त प्रमाणात खाल्ली जात नाही. या भाजीत भरपूर प्रमाणात असलेले पॉटॅशियम आणि कॅल्शियम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हरभऱ्याची भाजी खाण्याचे फायदे आणि ती कशी करावी याची सविस्तर रेसिपी आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

हरभऱ्याची भाजी खाण्याचे फायदे...

● हरभऱ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅलशियम असते. यामुळे हाडे आणि मसल्स मजबूत होतात.

● कार्बोहायड्रेटमुळे कमजोरी दूर होते, भरपूर उर्जा मिळते.हरभऱ्याच्या भाजीमध्ये कोलेस्टेरॉल नसते.

● हे हार्टच्या आजारात बचाव करते.

● हरभऱ्याच्या भाजीमध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

● फायबर्समुळे बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होते.

● हरभऱ्याच्या भाजी खाल्यामुळे कॉपर आणि झिंकमुळे त्वचेची चमक वाढते. केस काळे आणि दाट होतात.

● हरभऱ्याच्या भाजीमध्ये आयर्न हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते.

साहित्य:

हरबर्‍याच्याची भाजी

दाळीचे पीठ

तेल

मोहरी

जिरे

लसणाच्या पाकळ्या

वाळलेली मिरची

हिंग

हळद

बेसन

तिखट

मीठ

पाणी

कृती:

सर्वप्रथम एक मोठे भांडे घ्या. त्यात तीन मोठे चमचे तेल टाका. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, फोडणीचा कडकडाट झाला की त्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका. वाळलेली मिरची टाका, चवीला चिमूटभर हिंग आणि हळद टाका. लसूण थोडा परतला की कढईत दोन ते तीन ग्लास पाणी टाका. त्यानंतर त्या पाण्याला उकळी आली की दोन वाटी हरबर्‍याची भाजी घेऊन त्यात पाऊण वाटी हरबर्‍याच्या दाळीचे पीठ मिसळा. नंतर थोडे तिखट, मीठ, जास्त तिखट हवे असल्यास थोडा काळा मसाला टाका. हे सगळे एकत्र मिसळून घ्या. तोपर्यंत कढईतल्या पाण्याला छान उकळी आलेली असेल. आता त्या पाण्यात थोडे थोडे करीत मिसळलेली भाजी टाका. एका हाताने भाजी टाकायची आणि दुसर्‍या हाताने कढईत ती हलवत रहायची. भाजी चांगली गरम झाली की काढून ठेवा. या गरम भाजीवर मस्त लसणाची फोडणी टाकायची आणि तीळ लावलेल्या गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT