gul papadi  Esakal
फूड

Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी गूळ पापडी कशी तयार करायची?

विशेषत: हिवाळ्याच्या काळात गूळ खाण्याचे अनेक फायदे असतात.

सकाळ डिजिटल टीम

Gul papadi : गूळ कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरसने भरलेला असतो आणि त्यात जस्त, तांबे, थायामिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन देखील असतात. अभ्यासानुसार गुळात बी जीवनसत्त्वे, काही प्रमाणात वनस्पती प्रोटीन आणि भरपूर फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. विशेषत: हिवाळ्याच्या काळात गूळ खाण्याचे अनेक फायदे असतात. याच गूळापासून आज आपण गूळ पापडी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी आजच्या लेखात पाहणार आहोत.

साहित्य

1) दीड वाटी गव्हाचे पिठ

2) एक वाटी साजूक तूप, 

3) बारीक केलेला पाऊण वाटी गूळ

4) चार चमचे बारीक खोबरं

5) दोन चमचे खसखस

6) बारीक केलेले दोन चमचे बदाम-काजू

7) चिमूटभर मीठ

कृती

सर्व प्रथम कढईत गव्हाचे पिठ घालून भाजून घ्यावे. जरा भाजली की त्यात हळूहळू सगळं तूप टाकत जावे. आता पिठाला सोनेरी रंग येईपर्यंत ते मंद आचेवर भाजत राहा. हे पिठ आणि तुपाचं मिश्रण डोशाच्या पिठासारखं पातळ होतं. छान सुगंध आला की त्यात खोबरं, खसखस, मीठ आणि काजू-बदामाची पूड खालून भाजावे. मग त्यात बारीक केलेला गूळ घालून मिश्रण हलवावे आता गॅस बंद करून मिश्रण थोडं एकजीव करून तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवा आणि गरम असतानाच त्याच्या वड्या पाडा. मिश्रण थंड झालं की वडी वेगळी करून मस्त खावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT