Winter Recipe Esakal
फूड

Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने बाजरीचा खिचडा कसा तयार करायचा?

बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही.

सकाळ डिजिटल टीम

बाजारी खाण्याचे फायदे अनेक आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात. केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी बाजरीची भाकरी अगदी चवीने खाल्ली जाते. विशेषतः म्हाताऱ्या व्यक्तींसाठी बाजरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजण्यात येते. बाजरी ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरते.

गहू आणि तांदूळ यांच्यापेक्षाही अधिक उर्जा बाजरीमध्ये असते. त्यामुळे कधी- कधी रात्रीच्या जेवणात तांदुळाच्या खिचडीऐवजी बाजरीची खिचडी खाऊन पहा. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी अतिशय पोषक. ही घ्या एक सोपी आणि पारंपरिक रेसिपीरात्रीच्या जेवणात काय करावे, हा प्रश्न बऱ्याचदा गृहिणींसमोर असतो. तेच तेच पोळी, भाजी, भाकरी किंवा खिचडी असं नेहमीच जेवण करूनही कंटाळा येतो. 

काही तरी चटकदार, चव बदलणारं खावंसं वाटतं. पण पुन्हा असे पदार्थ खायचे म्हणजे रात्रीच्या वेळी जास्त जड होईल का असाही विचार मनात डोकावतो. म्हणूनच आरोग्यासाठी उत्तम, चवीला निराळं आणि खमंग असं काहीतरी रात्रीच्या जेवणात घ्यायचं असेल, तर महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ म्हणजेच बाजरीची खिचडी हा त्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. बाजरीच्या खिचडीला महाराष्ट्राच्या काही भागात बाजरीचा खिचडा असंही म्हणतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही.

प्रतिकारशक्ती वाढते. बाळंतीण झालेल्या महिलांसाठी तर बाजरी हे धान्य वरदान आहे असंच म्हणावं लागेल. बाळासाठी दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. महिलांना भरपूर दूध येण्यासाठी आणि पोटातील वातामुळे येणाऱ्या कळा घालविण्यासाठी बाळ झालेल्या बाळंतिणींना बाजरी नक्कीच वरदान ठरते. 

बाजरीमध्ये उच्च पोषणमूल्यं असतात. त्यामुळे बाजरीचा जेवणात नियमित वापर व्हायला हवा. बाजरीला इंग्रजीत पर्ल मिलेट म्हणतात. बाजरी दिसतेही अगदी मोत्यांसारखीच. मूळ आफ्रिकन असलेली बाजरी फार पूर्वी आपल्याकडे पिकवायला लागले आणि आता तर ती आपल्याकडचीच होऊन गेली आहे.

साहित्य:

1) एक वाटी बाजरी

2) एक वाटी मूग डाळ

3) अर्धी वाटी  तांदूळ

4) आवडीनुसार हिरव्या मिरच्या

5) शेंगदाणे

6) खोबऱ्याचे काप

7) लसूण पाकळ्या

8) कढीपत्ता 

9) जिरं 

10) मोहरी

11) काळा मसाला

12) मीठ चवीनुसार

13) तेल

14) सुक्या लाल मिरच्या

15) हळद

16) तिखट

17) हिंग

कृती 

सर्वप्रथम बाजरी स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे काढून 15 मिनिटं निथळत ठेवावी. 15 मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बाजरी जाडसर वाटून घ्या. बरेच लोक बाजरीचा कोंडा काढून टाकतात पण तसं करू नका. कारण हा कोंडाही पौष्टिक असतो.

मूगडाळ-तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. आता बाजरीची जाडसर भरड, मूगडाळ, तांदूळ एका स्टीलच्या पातेल्यात घाला. त्यात अंदाजे चार ते पाच वाट्या पाणी घालावे. नंतर खोबरं, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची मिक्सरमधून एकत्र वाटून घ्यावे. आणि हे वाटण त्यात घालावे. नंतर मग शेंगदाणे, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालावे. मोठ्या कुकरमध्ये हे पातेलं ठेवून कुकरच्या दोन शिट्या करून 8 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवावे. प्रत्येक कुकरचा अंदाज वेगळा असतो. तेव्हा आपल्या अंदाजानुसार ठेवा. साध्या खिचडीपेक्षा 5 ते 6 मिनिटं जास्त लागतील.खिचडा शिजल्यानंतर चमच्यानं नीट हलवून एकत्र करावा. कारण बाजरीचा लगदा भांड्याच्या तळाशी बसतो. नंतर एका छोट्या कढलीत तेल तापवा. तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, जिरं घालावे.ते तडतडलं की त्यात लसूण घालून चांगला लाल होऊ द्यावा.

आता त्यात कढीपत्ता घाला. कढीपत्ता तळला गेला की त्यात सुक्या लाल मिरच्या घाला. नंतर हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच गॅस बंद करावा. अशा प्रकारे बाजरीचा पौष्टिक खिचडा तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

SCROLL FOR NEXT