Bajri Methi Puri  Esakal
फूड

Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणाऱ्या बाजरी मेथी पुऱ्या कशा तयार करायच्या?

बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात.

सकाळ डिजिटल टीम

Bajari Benefits : बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक घटक मानले जातात. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी ही पोषक तत्व शरीराला आवश्यक असतात. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाण्याला जास्त महत्व आहे.मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. आजच्या लेखात आपण हिवाळ्यात खायला पौष्टिक असणाऱ्या बाजरी मेथी पुऱ्या कशा तयार करायच्या याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य :

एक वाटी स्वच्छ केलेली मेथी

कोथिंबीर 

आलं

मिरची

दोन वाटी बाजरी पीठ 

अर्धा वाटी बेसन

ओवा

हिंग

हळद

मीठ

धणे पावडर

गोडा मसाला


कृती:

सर्वप्रथम तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. कारण हे पीठ भिजवून ठेवलं तर ते नंतर सैल होतं. निवडून धुऊन चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, मिरची, बाजरी पीठ, ओवा, हिंग, हळद, मीठ, धणे पावडर, गोडा मसाला टाकावा. हे सर्व एकत्र करून घट्टसर पीठ भिजवून पुऱ्या काढाव्यात. बाजरीसोबत जोड म्हणून तांदूळ पिठी, कणिक किंवा थालीपीठ भाजणी पण घालता येते. त्यामुळे पुऱ्या मऊ  राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT