bhaji from jowar  Esakal
फूड

Winter Recipe : हिवाळ्यात ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक भजी कसे तयार करायचे?

ज्वारी वर एक थर असतो जो कॅन्सर चा प्रतिकार करू शकत असतो. ज्वारी मध्ये असलेल्या काही घटकांमुळे अकाली वृद्धत्व सुद्धा येत नाही.

सकाळ डिजिटल टीम

कुरकुरीत भजी खाण्याची मजा वेगळीच असते. पारंपारिक बेसन भजी सोडून तुम्ही हिवाळ्यात ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक भजी बनवू शकता. या भजी अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट असतात.

Health Benefits of Jowar : ज्वारी मध्ये असलेल्या फायबर मुळे बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) चं प्रमाण कमी होतं ज्यामुळे हृदया संबंधित होणारे आजार जसं की स्ट्रोक, अटॅक येण्याची शक्यता कमी होते .ज्वारी वर एक थर असतो जो कॅन्सर चा प्रतिकार करू शकत असतो. ज्वारी मध्ये असलेल्या काही घटकांमुळे अकाली वृद्धत्व सुद्धा येत नाही.ज्वारी ही फायबर युक्त असते. आपल्या शरीराला रोज 48% फायबरची गरज असते. फायबर मुळे अन्न नलिकेचं कार्य सुरळीत होत असतं. आजच्या लेखात आपण हिवाळ्यात ज्वारीच्या पिठापासून  पौष्टिक भजी कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

ज्वारी पकोडा बनवण्यासाठी साहित्य

1) एक वाटी ज्वारीचे पीठ

2) हिंग

3) ओवा

4) काळी मिरी

5) एक बटाटा

6) हळद

7) लाल तिखट

8) धने पावडर

9) जिरे पावडर

10) मीठ

11) तळायला मोहरीचे तेल

12) आले लसूण पेस्ट

13) काळे तिळ

कृती:

एका भांड्यात ज्वारीचे पीठ घ्यावे. आता त्यात हिंग, लाल तिखट, धनेपूड, हळद, आले पेस्ट, काळी मिरी पावडर, काळे तिळ ,जिरेपूड आणि मीठ घाला. हळू हळू पाणी घालून चांगले मिसळा आणि गुळगुळीत पीठ तयार करा.

आता बटाटाणी साल काढून त्याचे पातळ काप करावे. 

आता एका कढईत मोहरीचे तेल गरम करावे आणि ते स्मोकिंग पॉईंटवर येऊ द्या. तेलातून धुर कमी झाला की आणि ते थोडेसे हलके झाले की ते वापरण्यासाठी तयार आहे. आता फक्त बटाट्याचा तुकडा पिठात बुडवून गरम तेलात काळजीपूर्वक टाका.सर्व बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावे. सर्व भजी टीशू पेपरवर काढावे हे भजे तुम्ही पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT