Winter Recipe Esakal
फूड

Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारी कुळीथ पिठी कशी तयार करायची?

कोकणात कुळीथ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कडधान्याला देशावर हुलगे असं म्हणतात.

सकाळ डिजिटल टीम

कोकणात कुळीथ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कडधान्याला देशावर हुलगे असं म्हणतात. परंतु, हे अत्यंत उष्ण असल्यामुळे रक्तविकार असलेल्या व्यक्तींनी शक्यतो कुळीथ खाणे टाळावे.आजारपण आल्यास कुळथाचं कढणं किंवा सूप करुन रुग्णास दिल्यास त्याला आराम मिळतो. भरपूर ताकात कुळीथ शिजवून जिरे, तुपाची फोडणी दिली की उत्तम कढण तयार होते.कुळथाचं कढण वातनाशक असून जेवणातील रुची उत्पन्न करणारे आहे.आजच्या लेखात आपण हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारी कुळीथ पिठी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य :

एक वाटी कुळथाचं पीठ

एक मोठा कांदा

एक टोमॅटो

आठ-दहा सोललेल्या लसूण पाकळ्या

फोडणीसाठी जिरं-मोहरी 

दीड चमचा मिरची पावडर

थोडी हळद

दीड पळी तेल

चवीपुरतं मीठ-साखर

कृती : 

एका भांड्यात कुळथाचं पीठ घेऊन त्यात पाणी ओतून ते नीट एकजीव करा. हे पीठ चांगलं पातळ झालं पाहिजे. त्यात गुठळ्या राहू देऊ नका. नंतर गॅसवर लोखंडी कढई ठेवून त्यात जरा जास्तच तेल टाका. तेल कडकडीत तापल्यावर जिरं-मोहरीची फोडणी द्या. ती तडतडल्यावर लसूण पाकळ्या ठेचून टाका. लसणाचा वास घमघमल्यावर बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा शिजत आल्यावर त्यात हळद-मसाला आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाका. मीठ-साखर टाका. हे सगळं मिश्रण नीट शिजून एकजीव झाल्यावर त्यात पाण्यात कालवलेलं कुळथाचं पीठ टाका आणि झाकण मारा. पाचेक मिनिटात पिठी मस्त शिजते. तिचा वास घरात दरवळायला लागला की, गॅस बंद करा आणि लगेच पिठी भाताबरोबर हाणायला सुरुवात करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT