ragi Esakal
फूड

Winter Recipe:हिवाळ्यात शरिराला पौष्टिक असणारे नाचणीचे खरपूस धपाटे कसे तयार करायचे?

नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहते.

सकाळ डिजिटल टीम

नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहते.पोटदुखी, अपचन तक्रारी दूर होतात.अशक्तपणा दूर होतो.कंबर दुखत असल्यास नाचणीची पेज प्यावी.शरीरावर फोड आल्यास ते फोडण्याकरिता नाचणीच्या पीठाचे पोटीस बांधावे. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.अशा या बहुगुणी नाचणीचे हिवाळ्यात पौष्टिक धपाटे कसे करायचे याची सविस्तर रेसिपी आज आपण या लेखात पाहणार आहोत.

साहित्य :

1) दोन वाटी नाचणीचे पीठ

2) दिड वाटी ज्वारीचे पीठ

3) दोन ते तिन चमचे बेसन पीठ

4) दोन चमचे हिरवी मिरची व लसूण पेस्ट

5) चवीप्रमाणे मीठ

6) तेल

7) एक चमचा तीळ

8) एक चमचा ओवा

9) बारीक चिरलेली कोथिंबीर

10) एक मध्यम आकाराचा कांदा

11) पाणी

कृती:

एका बाऊलमध्ये सर्व पीठे घालून मिक्स करून घेणे. नंतर ओवा,तीळ, मीठ घालून मिक्स करून घेणे.ठेचा,चिरलेली कोथिंबीर व कांदा, तेल घालून मिक्स करावे.थोडे-थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घेणे.

साधारणपणे 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे.गॅसवर तवा तापत ठेवावा. सुती कापड घेऊन त्याला पाणी लावणे. एक छोटा गोळा घेऊन, धपाटे थापून घेणे. त्याला बोटाने होल पाडून घ्यावे.

तवा तापल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून त्याला तेल लावून घेणे. कापडासहित धपाटे तव्यावर टाकून घेणे. वरून कापड काढून घेणे. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे.

झाकण काढून घेणे व दुसऱ्या बाजूलाही तेल लावून खरपूस भाजून घेणे. अशाप्रकारे सर्व धपाटे करून घेणे.गरमागरम नाचणीचे पौष्टिक धपाटे दही किंवा कोणत्याही उसळी बरोबर तुम्ही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

NEET Protest Pune: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात ‘जेन झी’ची तिरंगा पदयात्रा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना

Dharmendra Pradhan Resignation: धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जेन-झीचा विराट एल्गार, पावसाला-धमक्यांना न जुमानता तरुणाई रस्त्यावर

Tribal Voters at Risk: कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी मतदार वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांची प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT