World Health Day 2024: Sakal
फूड

World Health Day 2024: 'या' 7 पौष्टिक पदार्थांनी करा दिवसाची सुरूवात, राहाल तंदुरूस्त अन् निरोगी

World Health Day 2024: तुम्ही जागतिक आरोग्यदिनानिमित्त पुढील पौष्टिक पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.

Puja Bonkile

World Health Day 2024 healthy breakfast for healthy life try these recipes

दिवसाची सुरूवात चांगली झाली की पुर्ण दिवस देखील चांगला जातो. यासाठी सकाळी पौष्टिक नाश्ता करणे गरजेचे आहे. यामुळे दिवसभर पोट भरलेले राहतेच, शिवाय शरीरही निरोगी राहते. परंतु अनेकवेळा लोक घाईघाईमध्ये नाश्ता करत नाही. सकाळी नाश्त्यात झटपट काय बनवावे हे समजत नाही. आज अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया.

  • ढोकळा

सकाळच्या नाश्त्यात ढोकळ्याता आस्वाद घेऊ शकता. हा पदार्थ बनवणे अगदी सोपा आहे. तुम्हा टिफिनमध्ये देखील घेऊन जाऊ शकता.

  • उपमा

गरमागरम उपमा बनवायला सोपो असून पोष्टिक देखील आहे. तुम्ही सकाळच्या नाश्तात उपमा खाऊ शकता. यामुळे दिवसभर पोट भरलेले राहते. तसेच रवा आधीच भाजून ठेवला तर उपमा कमी वेळेत तयार होतो.

  • सॅलेड

तुम्ही सॅलेड पॅक करून सोबत घेऊन जाताना खाऊ शकता. सॅलड हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये मोड आलेले कडधान्यांचा वापर करू शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

  • इडली

जर तुम्हाला आरोग्यदायी आणि चविष्ट असे काही बनवायचे असेल तर इडली सांबार हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही इडलीसोबत नारळाची चटणी खाऊ शकता. इडलीने पोट भरलेले राहते. तसेच हा पदार्थ पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.

  • डोसा

डोसा दक्षिण भारतात तसेच संपूर्ण देशात आवडीने खाल्ला जातो. नारळाच्या चटणीसोबत नाश्त्यात आस्वाद घेऊ शकता. डोसा अगदी कमी तेलात बनवला जातो, म्हणून हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

  • बेसण चिला

तुम्ही सकाळच्या नाश्त्यात बेसण चिला सहज बनवू शकता. यामध्ये बारिक कांदा, दही, टोमॅटो, जिरं, लाल तिखट , चवीनुसार मीठ टाकून झटपट बनवू शकता. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता. यामुळे दिवसभर पोट भरलेले राहते. हा पदार्थ कमी वेळेत तयार होतो.

  • पोहे

हा असा पर्याय आहे जो बनवायला खूप सोपा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते आवडते. सकाळच्या नाश्त्यात पोहे खाल्ल्याने पोट भरलेले राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT