World Vegetarian Day esakal
फूड

World Vegetarian Day : वर्ल्ड व्हेजिटेरियन डे ला बनवा ही चटपटीत व्हेज डिश

पनीर टिक्का ही डिश फक्त स्टार्टर म्हणून नाही तर तुम्ही दुपारच्या लंचमध्ये किंवा रात्रीच्या डिनरमध्येसुद्धा खाऊ शकता

साक्षी राऊत

World Vegetarian Day : आज वर्ल्ड व्हेजिटेरियन डे आहे. बरेच लोक नॉन व्हेज खात नाहीत. तेव्हा त्यांच्यासाठी व्हेजमध्येसुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत. तेव्हा आज आपण चटपटीत अशा पनीर टिक्क्याची रेसिपी जाणून घेऊया.

पनीर टिक्का ही डिश फक्त स्टार्टर म्हणून नाही तर तुम्ही दुपारच्या लंचमध्ये किंवा रात्रीच्या डिनरमध्येसुद्धा खाऊ शकता.

साहित्य

250 ग्राम फ्रेश पनीर

अर्धा कप फ्रेश दही

चवीनुसार मीठ

अर्धा छोटा चमचा मिरे पावडर

२ चमचे तूप

अर्धा छोटा चमचा जीरे पावडर

अर्धा ते एक चमचा आलं लसणाची पेस्ट

१-२ शिमला मिर्ची

३ टोमॅटो

१ चमचा चाट मसाला

चिमूटभर लाल मिर्ची पावडर

१-२ चमचे बारीक कापलेली कोथिंबीर

१ लिंबू

बनवण्याची पद्धत

पनीर धुवून त्याला मोठ्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या.

आता एका भांड्यात दही फेटून घ्या.

या दह्यात मीठ, काळे मिरे पावडर आणि आल्या लसणाची पेस्ट घाला.

आता कापलेले पनीरचे तुकडे या सारणात २०-३० मिनिटे घालून ठेवा.

२०-३० मिनिटानंतर पनीर दही शोषून घेईल.

आता पनीरचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घ्या आता दोन तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.

आता शिमला मिर्ची धुवून त्यातील बिया काढून लांब काप करून घ्या.

आता टोमॅटो धुवून तो सुद्धा गोल किंवा लांब कापून घ्या.

आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा.

कढई गरम झाल्यावर त्यात तूप घाला.

तूप गरम झाल्यावर त्यात लो फ्लेमवर पनीरचे तुकडे घाला, त्याला सोनेरी रंग येतपर्यंत शिजू द्या.

आता कढईतील उरलेल्या तेलात जिरे, आलं लसणाची पेस्ट घालून २ मिनिटे शिजू द्या.

आता शिमला मिर्ची त्यात घाला आणि १ मिनिटे झाकणबंद ठेवून शिजू द्या.

त्यात आता चाट मसाला, लाल मिर्ची पावडर आणि इतर मसाले घाला आणि लो फ्लेमवर शिजू द्या.

दोन तीन मिनिटे शिजल्यानंतर तुमचा टेस्टी पनीर टिक्का सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे.

आता गार्निशिंगसाठी त्यावर कोथिंबीर आणि लिबांचा रस घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT