तांब्याच्या ६ फुटी गणेशमूर्तीने नाशिकच्या वैभवात भर  
ganesh article

तांब्याच्या ६ फुटी गणेशमूर्तीने नाशिकच्या वैभवात भर

श्रीराजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे २०१३ मध्ये देशातील एकमेव तांब्याची सहा फुटी गणेशमूर्ती साकारण्यात आली

युनूस शेख :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : श्रीराजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे २०१३ मध्ये देशातील एकमेव तांब्याची सहा फुटी गणेशमूर्ती साकारण्यात आली. मुस्लिम कारागिरांकडून तयार करण्यात आलेली ही मूर्ती शहराच्या वैभवात भर पाडणारी ठरली आहे.

जुनी तांबटलेन येथील श्रीराजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून २००६ साली अशा प्रकारची आगळीवेगळी मूर्ती तयार करण्याचा संकल्प केला होता. २०१३ मध्ये संकल्प पूर्णत्वास आला. मंडळाचे अध्यक्ष गणेश बर्वे त्यांचे कुटुंबीयांसह मंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून एकमेव तांब्याची मूर्ती साकारण्याचा इतिहास घडविला.

मूर्तीची विशेषतः म्हणजे देशातील एकमेव तांब्याची श्री लक्ष्मी गणेश मूर्ती आहे. मूर्तीची उंची सहा फूट असून, पूर्णपणे तांब्याने भरीव आहे. १ हजार किलो वजन आहे. इतकेच नाही तर पाच ते सहा मुस्लीम कारागिरांकडून पाच महिन्याच्या कालावधीत मंडळाच्या पदाधिकाऱ्‍यांच्या संकल्पनेला मृत स्वरूप दिले. गणेशोत्सव काळात शहराच्या विविध भागातील भाविक दर्शनासाठी येत असतात.

वेगळे काही करण्याच्या संकल्पनेने तांब्याची गणेशमूर्ती तयार करण्याचा संकल्प करण्यात आला होता. यशस्वीरीत्या देशातील एकमेव तांब्याची मूर्ती बनवण्याचा संकल्प पूर्ण केल्याचे समाधान वाटते.

- गणेश बर्वे, मंडळाचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad Announced: हार्दिक पांड्याचे भारतीय संघात पुनरागमन! द. आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी शुभमन गिललाही संधी, पण...

Uddhav Thackeray: ...ही तर सत्तेसाठी लाचारी, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

Latest Marathi News Live Update : विजेचा धक्का लागल्याने 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Sangli News : आटपाडीत ८०% मतदानाची ऐतिहासिक नोंद; कोणाला तारण, कोणाला घातसंपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे

Mumbai Traffic: मुंबईच्या ट्रॅफिकपासून दिलासा मिळणार! एलबीएस ते बीकेसीपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी जोडणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT