Ganesh Festival  Team eSakal
ganesh article

जेव्हा बाप्पा सर्वसमावेशकतेचं प्रतिक बनतो....

उत्सव साजरा करायला वयाचं बंधन येत नाही तसंच शारिरिक व्यंगाचंही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सव सर्वांचा उत्सव. भक्तीभावाबरोबरच मनंही जोडणारा. हा उत्सव साजरा करायला वयाचं बंधन येत नाही तसंच शारिरिक व्यंगाचंही. नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक्स स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी आपल्याला मिळालेल्या विशेष प्राविण्यातून भारतीयांची मनं जिंकली. त्यांच्या यशात सारे भारतीय सहभागी झाले. नेमका हाच धागा पकडून पुण्याच्या विलास जावडेकर डेव्हलपर्सनी हाच यंदाचा गणेशोत्सव आगळ्या पद्धतीने साजरा करायचा ठरवला. त्यातून निर्मिती झाली एका शाॅर्ट फिल्मची.

तीन मिनिटांच्या या शाॅर्ट फिल्ममध्ये कहाणी आहे दोन छोट्या भावंडांची. यापैक एक आहे मूकबधीर. आपल्या सोसायटीत गणेशोत्सव साजरा होत असताना दुसरा भाऊ आरती म्हणण्यासाठी स्टेजवर जातो आणि आरतीचे शब्द विसरतो. खाली बसलेला मूकबधीर भाऊ त्याला खुणांच्या भाषेतून आरतीचे शब्द सांगतो. त्याच्या या कृतीनं सगळेच भारावतात आणि त्याला स्टेजवर बोलावतात. स्टेजवरुन तो खुणांच्या भाषेतून आरती सादर करतो आणि समोरचा प्रेक्षकवर्ग त्याच भाषेत त्याला साथ देतो....

या छोट्याशा फिल्ममधून संदेश जातो तो सुखदुःखात सर्वांना सामावून घेण्याचा. विलास जावडेकर डेव्हलपर्स म्हणून आम्ही नेमकी हीच भावना जपण्याचा प्रयत्न करतो. आम्ही केवळ घरं बांधत नाही तर समविचारी लोकांना एकत्र येण्याचं एक व्यासपीठच उपलब्ध करुन देतो, असे विलास जावडेकर डेव्हलपर्सचे सीईओ आदित्य जावडेकर यांनी सांगितलं. हीच भावना सेतू अॅडव्हर्टायझिंगचे ऋग्वेद देशपांडे यांनीही व्यक्त केली. या फिल्मची संकल्पना त्यांची आहे. सर्वसमावेशकतेचं प्रतिक म्हणून आम्ही गणेशाचा उत्सव साजरा करायचा ठरवला, असं त्यांनी सांगितलं. निखिल खैरे यांची पटकथा असलेली आणि वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केलेली ही छोटी फिल्म गणेशाच्या मांगल्यपूर्ण उत्सवाचा एका नवा रंग दाखवून देते. नेमकी त्याच कारणाने ही छोटी फिल्म सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT