Ganpati festival 2021 file image
ganesh article

गणेशोत्सव 2021 : गणेशाची मूर्ती कशी असावी?

सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव 2021 : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीनिमित्त घरी स्थापन केली जाणारी गणेशमूर्ती कशी असावी, याबद्दल मूर्तिशास्त्र व धर्मशास्त्रात विवेचन केलेले आहे. ‘अंगुष्ठपर्वादारभ्य वितस्तिं यावदेव तु। गृहेषु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधैः।।’

अर्थात्‌, अंगठ्याच्या पेराच्या मापापासून ते १२ अंगुल परिमाण असलेली मूर्ती घरी स्थापन करावी, त्यापेक्षा मोठी मूर्ती स्थापन करू नये. गणपतीची मूर्ती आणताना ती शाडूमातीची व सुबक असावी. पद्मासन घातलेली, ४ हात असलेली, लाल वस्त्र किंवा लाल शेला परिधान केलेली गणेशमूर्ती जास्त प्रशस्त सांगितलेली आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन हे पाण्यात करावे लागते. कारण गणपती ही देवता जलतत्त्वाची अधिपती देवता सांगितलेली आहे. कपिलतंत्रात ‘जीवनस्य गणाधिपः’ असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे.

प्रत्येक देवतेचे पूजन करताना त्या त्या देवतेचे स्वतंत्र अष्टगंध सांगितलेले आहे. गणेशाचे पूजन करताना ‘केशरं रोचना मांसी कस्तुरी अगरुस्तथा। सुचंदनं तथा मुस्था रक्तचंदनमष्टमम्‌।।’ अर्थात्‌ गणपतीचे अष्टगंध तयार करताना केशर, गोरोचन, जटामांसी, कस्तुरी, कृष्णागुरू, चंदन, नागरमोथा व रक्तचंदन हे ८ जिन्नस वापरावेत असे सांगितलेले आहे. तसेच, चिंतामणीकल्प या प्राचीन ग्रंथात गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत मोरयाला कोणते विशेष नैवेद्य दाखवावेत त्याविषयी माहिती दिलेली आहे.

चतुर्थीस - अनारसे, पंचमीस - उडदाच्या डाळीचे वडे, षष्ठीस - पुऱ्या, सप्तमीस - घारगे, अष्टमीस - पंचपक्वांनांचे जेवण, नवमीस - पायस (तांदळाची खीर), दशमीस - दूध, एकादशीस - पंचखाद्य, द्वादशीस - केळी, त्रयोदशीस - डाळिंब, अनंत चतुर्दशीस - जांभूळ याप्रमाणे नैवेद्य दाखवावेत.
- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT