

Abhishek Sharma - Ishan Kishan | England vs India 2nd T20I
Sakal
England vs India 2nd T20I: इंग्लंड विरुद्ध भारत संघात मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताकडून दमदार सुरुवात झाली होती. पण नंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले, विशेषत: सॅम करनने (Sam Curran).
पण अखेरच्या षटकात तिलक वर्माने (Tilak Varma) केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाला १९० धावांचा टप्पा पार करता आला. भारताने इंग्लंडसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.