ganesh article

गणेश पूजेसाठी दुर्वा मिळणे झाले अवघड

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव काळातही गणेश भक्तांना दुर्वासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे.

केतूर (सोलापूर): आधुनिक, प्रगत शेती करण्याच्या हव्यासापोटी शेतकरी तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहे. गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या दुर्वा अर्थात हराळीच्या जुडीसाठी सध्या मोठे प्रयास करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर तसेच पाण्याच्या पाटाच्या कडेला आणि परस बागेतही दूर्वा (हराळी) मोठ्या प्रमाणावर येत असे. तिचा वापर गणेशोत्सव तसेच संकष्टी चतुर्थीला पूजेसाठी म्हणून केला जातो तर गणेशोत्सव काळात दुर्वांच्या जुडीला महत्त्वाचे स्थान असते. मात्र मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर शेतातील तणनाशकांचा वारेमाप वापर होत असल्याने शेतात बांधावर दूर्वा मिळणे अवघड झाले आहे. गणेशोत्सव काळातही गणेश भक्तांना दुर्वासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे.

हराळी हे खोलवर जाणारे तण असल्याने त्याच्या नाशासाठी पावरबाज तणनाशकांचा जास्तीत जास्त वापर केला जातो, त्यामुळे हराळीचा नायनाट केला जात आहे. शेतातील तणनाशक खुरपणीसाठी महिला मजुरही मिळत नाही, त्यांना मजुरीचे जास्तीचे दर द्यावे लागतात. त्यासाठी वेळही जातो हे सर्व टाळण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा वापर करीत आहेत. वाढत्या तणनाशकांच्या वाढणाऱ्या वापरामुळे हराळीचे प्रमाण मात्र कमी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT