ganesh visarjan Sakal
ganesh article

दर वर्षी गणेशस्थापना अन् विसर्जन का?

पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

श्रीगणेश पुराण धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्रीगणेशाची आराधना केली आणि गणपतींना महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपतींनी होकार दिला. हे लिखाण दिवस-रात्र चालले आणि त्यामुळे गणपतींना थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज्य झाले. अशा वेळी गणपतींच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यासांनी श्री गणपतींना मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतींची यथासांग पूजा केली.

मातीचे लेपन केल्याने गणपती आखडून गेले म्हणून त्यांना पार्थिव मृण्मय गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यासांनी गणपतीकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतींना पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसांत व्यासांनी गणपतींना खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हापासून गणपती बसविण्याची प्रथा पडली. लोकमान्य टिळकांनी समाजजागृती आणि प्रबोधन यासाठी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले.

ती प्रथा आजही अव्याहत आणि अखंडितपणे सुरू आहे.

मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT