Ganpati
Ganpati sakal
ganesh article

गजवदन सुरंगी रंगसाहित्यरंगी।

सकाळ वृत्तसेवा

गणांचा अधिपती असलेला, चौदा विद्या चौसष्ट कलांचा दाता असा गणेश हा विविध संतांच्या,उपासकांच्या आणि कवींच्याही चिंतनाचा विषय ठरला नसावा तर नवल!

मनांवर अधिराज्य गाजविणाऱ्या आधुनिक युगातील चित्रपटसृष्टीलाही गजाननाने मोहून टाकले आहे याचा प्रत्यय विविध गीतांमधून अनुभवाला येतो.

नृत्यगणेशाचे समर्थ रामदासस्वामींनी केलेले वर्णन वाचून आपलं भानही हरपून गेलं असेलच. गणेशाचं तात्त्विक रूप महाराष्ट्र मनात सोप्या शब्दात ठसवलं ते ज्ञानेश्वर माऊलींनी!

ओम नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या।

जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।

देवा तुचि गणेशु। सकलमतिप्रकाशु।

म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी।।

अकार चरणयुगुल।उकार उदर विशाल।

मकार महामंडल। मस्तकाकारे।।

हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रह्म कळवले।

ते मिया श्रीगुरुकृपा नमिले। आदिबीज।।

ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या प्रारंभीच गणेशाच्या तात्त्विक रूपाचे वर्णन करताना माउली म्हणतात...

तरी तर्कु तोच फरशु। नीतिभेदु अंकुशु।

वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे।।

संत नामदेव महाराज म्हणतात,

चतुर्थ आयुधे शोभताती हाती। भक्ताला रक्षिती निरंतर।

भक्तवत्सला ऐके पार्वतीनंदना। नमन चरणा करितसे।।

गाणपत्य संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक मोरया गोसावी म्हणतात, अहो, येई तू मोरया, हो त्रयलोक विसावया। जडडीव तारावया हो तूचि।।

संसाराचा भवसागर पार करून जड, मूढ, भक्तांचे तारण करणारा गणेश त्रैलोक्याला स्थिरता देणारा आहे.

रामविजयग्रंथात कवी श्रीधरांनी विवेकाचा अंकुश हाती घेतलेल्या गणेशाचे केलेले गुणवर्णन तसेच मध्वमुनीश्वर, कवी मोरोपंत, कवी नरेंद्र, शिवदास गोमा यांच्याही गणेशरचना समजून घेण्यासारख्या आहेत. भक्तिरंगात रंगलेला गणेश शाहिरांच्या कवनातूनही डोकावला आहे.

शाहीर प्रभाकरांच्या कवनात गीताच्या रचनेची आज सिद्धी करण्यासाठी हे गणराया तू ये अशी विनंती केलेली दिसते.

गौरीसुता सभे लंबोदरा ये। सांदुरमर्दन विघ्नहरा ये।

गीत प्रसंगी रे करी आज सिद्धी। गातो आधी तुला विघ्नहरा ये।

पूजाप्रसंगी वंदनीय गणेश कलेच्या सादरीकरणाप्रसंगीही अग्रस्थानी स्मरणीय आहे. त्याच्या आशीर्वादानेच शाहिरांची कला जनमानसात पोहोचली आहे.

गणपती ही सर्वांचेच आराध्य दैवत आहे. गणपतीचा प्रत्येक गुण प्रेरणादायी आहे. कोणत्याही कार्याला त्याचे आशीर्वाद मागण्याची परंपरा विविध माध्यमातून दिसून येते.

प्रत्येकालाच ‘आपलंसं’ करणारा, ‘आपला’ वाटणारा असा हा आपला लाडका बाप्पा साहित्यरंगात रंगून गेलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT