Ganpati
Ganpati sakal
ganesh article

वंदन व्रातपतिला.. वंदन प्रमथेशाला।

सकाळ वृत्तसेवा

समाजात विद्वान, सदाचारी, समाजाचे नीतिनियम आचरणारे लोक असतात तसेच समाजापासून वेगळे राहणारे, समाजाच्या चालीरीती न स्वीकारणारेही असेही लोक आपण अनुभवत असतो. वैदिक काळातही समाजरचनेत विविध गट अस्तित्वात होते असे विविध ग्रंथांमधील संदर्भांवरून दिसून येते.

यजुर्वेदातील रुद्रसूक्तामध्ये रुद्र ही देवता चोरांचीही मानली गेली आहे तसाच अथर्वशीर्षात गणपती हा व्रात्यांचा अधिपती मानला गेला आहे. व्रात्य म्हणजे खोडकर असा अर्थ आपल्याला साधारणपणे माहिती असतो. वैदिक परंपरेनुसार उपनयन संस्कार झालेला नाही त्यांना व्रात्य म्हटले जात असे. यांना सावित्रीपतित म्हणजे सवितृ देवतेचा गायत्री छंदातील जो मंत्र त्यापासून दुरावलेले असेही म्हटले जात असे. उपनयन संस्कारामध्ये या गायत्री मंत्राची दीक्षा महत्त्वाची असते. ज्यांच्यावर हा गायत्री मंत्राचा संस्कार झाला नाही असे लोक म्हणजे व्रात्य!

हे व्रात समुदायाचे लोक त्याकाळी प्राण्यांची शिकार करून त्यावर जगत. शरीराला जाणीवपूर्वक त्रास होईल अशा प्रकारची कठीण व्रते आचरीत असत. ज्ञानोपासनेची, यज्ञाची परंपरा सांभाळणा‍ऱ्या समुदायांपेक्षा त्यांचे जीवन हे असे वेगळे असावे असे मानले जाते. (विविध अभ्यासक याविषयी आपली मते नोंदविताना दिसतात.)

गणपती अथर्वशीर्षात अशा समुहांचा अधिपती म्हणून गणेशाला ‘व्रातपती’ असे म्हटलेले आहे. गणेशाची सर्वसमावेशकता यातून दिसून येते.

आपल्या नेतृत्वगुणाने समाजाला दिशा देणारा गणपती व्रात्यसमूहालाही मार्गदर्शन करतो आहे. त्यांनाही गणेशाने स्वीकारलेले आहे, त्यागलेले नाही हा त्याचा एक विशेष गुण. अथर्वशीर्षात नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमःप्रमथपतये असे गणेशाला वंदन केलेले आहे. तो समूहाचा नेता आहे, तो प्रमथांचा म्हणजे शंकराच्या गणांचा नायक आहे आणि तो व्रात्यांचाही अधिपती आहे. ज्यांची संघटना घडवून आणायची आहे अशा व्यक्तींना गुण-दोषांसकट स्वीकारणे हे नेत्याचे प्रथम कर्तव्य आहे. तो त्याचा मूलभूत गुणही असावा लागतो. आपल्या व्यक्तिमत्त्वातील उत्तम गुणांनी आपल्या समूहातील सदस्यांना सत्कार्याची प्रेरणा देत राहून सुसंघटित समाज घडविण्याची प्रेरणा हा व्रातपती गणपती आपल्याला देतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT