Akola news The only wooden Ganpati of Khamgaon in Maharashtra 
Ganesh Chaturthi Festival

महाराष्ट्रातील एकमेव खामगावचा लाकडी गणपती

विवेक मेतकर

खामगाव (जि.बुलडाणा) : नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे.  या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे दीडशे वर्षांपूर्वी झाली. 


दरगणेश चतूर्थीपासून अनंत चर्तुदशी पर्यंत या मंदिरात दर्शनार्थी व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणूकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची १५० वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे.


या नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी खामगांवात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व छत्तीसगडवरून मोठया प्रमाणावर भाविक भक्त येतात. शिव व पेशवेकाळात सुमारे १५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इतरत्र कुठे नसेल अशा आखीव व रेखीव लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 


सहा फूट उंचीची ही मुर्ती अतिशय आकर्षक लोभस व देखणी आहे. संपूर्ण लाकडी शिल्पातून ही मूर्ती साकार झाली आहे. काष्ठशिल्पाचा तो पुरातन वैभवशाली तसेच प्रेरणादायी ठेवा आहे. यामूर्तीची प्रतिष्ठापना आचारी अय्या लोकांनी केली आहे.

स्वातंत्र्यानंतर या मंदिराकडे खामगांवकरांनी विशेष लक्ष दिले. 
सन १९५० नंतर खामगांवचे अडते मेसर्स जयनारायण नंदलाल व इतर धान्य व कापूस खरेदीदारांनी नोंदणी केली.  लाकडी गणपती श्रीगणेश मंदिराचे त्यावेळी विश्वस्त म्हणून माताशरण दुबे, लक्ष्मण हिवरकर, त्र्यंबकलाल पुरवार, दत्तात्रय वरणगांवकर, एकनाथ जयराम, भिकाजी निंबाजी व गंगाधर पिवळटकर यांनी काम पाहिले. 

यानंतर सन १९९५ साली धर्मदाय आयुक्तांनी आर. बी. अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात हे मंदिर दिले. त्यानंतर सन १९९६-९७ मध्ये मिंदराचा जिर्णोध्दार करून नवीन वास्तू बांधण्यात आली. मंदिराची वास्तू आधूनिक मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे.

खामगांवात विसर्जन मिरवणूकीत लाकडी गणपतीला प्रथम मानाचे स्थान आहे. जोपर्यंत लाकडी गणपतीची मिरवणूक फरशीवर येत नाही तोपर्यंत इतर मंडळाच्या मिरवणूकीस सुरूवात होत नाही. 

ही परंपरा खामगांवात तंतोतंत पाळली जाते. लाकडी गणपतीची मिरवणूक न निघाल्यास इतरही मिरवणूका निघत नाहीत. अलिकडे मंदिर विश्वस्तांनी अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यात रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर, अन्नदान, सांस्कृतिक कार्यक्रम आदिंचा समावेश आहे. खामगांवचा लाकडी गणपती महाराष्ट्रातील एकमेव असल्याने व त्याला दीड शतकाची परंपरा असल्याने भाविकांची या गणपतीवर प्रचंड श्रध्दा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT