Ganesh Chaturthi 2023 esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाचा बड्डे! पुजाऱ्यांनी कापला केक अन् भक्तांच्या दर्शनासाठी रांगा

देशभरात गणेशोत्सवाला उधाण, वाराणसीत भक्तांनी केला बाप्पाचा बड्डे साजरा

Pooja Karande-Kadam

Ganesh Chaturthi 2023: आज देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. मोठ्या उत्सहात भक्तांनी गणेशाचे स्वागत केले आहे. पण, वाराणसीतील एका मंदिरात गणपती बाप्पांचा जन्मदिवस थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

भगवान शंकरांची भूमी म्हणून वाराणसीला महत्त्वाचे स्थान आहे. कालच्या दिवशी हरतालिकेच्या निमित्ताने महिलांनी माता पार्वतीचे आणि शिवशंकरांचे पूजन केले. आणि आज गणेशाला मोठ्या उत्साहात घरी आणले. गणेशांच्या मंदिरात आज भक्तांची रीघ लागलेली असते. वाराणसीतील एक गणेशाच्या मंदिरात पुजाऱ्यांनी केक कापून बाप्पाचा बड्डे सेलिब्रेट केला आहे.  

वाराणसीतील माता कुष्मांडा देवीच्या मंदिरानजीक असलेल्या दुर्ग विनायक गणेश मंदिरात फुलांची आरास करण्यात आली आहे. या मंदिरात नेहमीच गणेश भक्तांची गर्दी असते. विशेषत: गणेश चतुर्थीला लोकांची झुंबड उडते. गणेशाला आपण शुभ प्रसंगी पूजतो, बाप्पाच्या चरणांवर डोकं ठेऊन नतमस्तक होतो. बाप्पा आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतो. (Ganesh Chaturthi 2023)

आज बाप्पांचा वाढदिवस म्हणून पुजारी आणि भक्तांनी केकही कापला. या मंदिरातील पुजारी अनुराग मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही मंदिरात विविध प्रकारे गणेश चतुर्थी साजरी करतो. देवांना रोज काकडारती, अभिषेक, पूजा, फुले, हार अर्पण करतो. तर आज आम्ह वेगळं काहीतरी म्हणून केक कापून देवांचा जन्मोत्सव साजरा केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT