Ganesh Chaturthi sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2023: गणपती बाप्पाला खास ड्राय फ्रुटचे मोदक करा अर्पण, ही आहे सोपी रेसिपी

आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत.

Aishwarya Musale

गणेश चतुर्थी हा सण सुरू झाला आहे. प्रत्येक घरात पंडाल सजवले आहेत. सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होत आहे. हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे.

यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 28 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपतीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी लोक कोणतीही कसर सोडत नाहीत. अशा वेळी मोदक बनवणेही खूप महत्त्वाचे ठरते. खरंतर मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य असल्याचं म्हटलं जातं.

त्याच बरोबर तुम्ही बाप्पाला अर्पण करण्यासाठी अनेक वेळा माव्याचे मोदक बनवले असतील, पण आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवण्याच्या रेसिपी सांगणार आहोत. या सोप्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही गणपती बाप्पाला घरबसल्या वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पटकन अर्पण करू शकता, चला तर मग ड्राय फ्रुटचे मोदक कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

ड्राय फ्रुटचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 8 ते 10 काजू

  • 8 ते 10 बदाम

  • 2 चमचे नारळाचे तुकडे

  • 1/2 टीस्पून वेलची पावडर

  • 1 कप पोहे

  • 1/2 कप गूळ

  • 2 चमचे कोमट दूध

  • 2 चमचे देशी तूप

ड्राय फ्रुटचे मोदक कसे बनवायचे?

सगळ्यात पहिले 1 कप पोहे स्वच्छ करून त्यात काजू आणि बदाम बारीक चिरून घ्या.

कढईत पोहे टाकून गॅसवर गरम करायला ठेवा.

पोहे मंद आचेवर कोरडे भाजून घ्या आणि नंतर एका मोठ्या भांड्यात वेगळे काढा.

एका पातेल्यात तूप घालून काजू-बदाम भाजून घ्यायचे आहेत.

हलके भाजून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले पोहे आणि भाजलेले काजू, बदाम, गुळाचे तुकडे, नारळाचे किस आणि वेलची पूड घालून चांगले बारीक करा.

तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून त्यात थोडं देशी तूप आणि २ चमचे कोमट दूध घालून मिक्स करा.

तुम्हाला हे मिश्रण मऊ पिठासारखे तयार करायचे आहे.

मिश्रण पिठासारखे मऊ झाल्यावर त्याचे छोटे गोळे घेऊन मोदकाच्या आकारात बांधायला सुरुवात करा.

तसेच सर्व पिठाचे मोदक तयार करावेत. आता मोदक सेट होण्यासाठी थोडा वेळ सोडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT