Ganesh Chaturthi sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2023: बाप्पासाठी बनवा पान गुलकंदाचे मोदक, ही आहे सोपी रेसिपी

गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही घरीच पान गुलकंदाचे मोदक तयार करु शकता.

Aishwarya Musale

गणेश चतुर्थीच्या सणाचा आज पाचवा दिवस आहे. यंदा हा उत्सव भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबरपासून सुरू झाला असून २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्याच बरोबर 10 दिवस मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवण्याच्या अगदी सोप्या रेसिपी सांगत आहोत.

असे मानले जाते की गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात आणि त्याशिवाय त्यांचा नैवेद्य अपूर्ण आहे. आम्ही तुम्हाला पाचव्या दिवशी बाप्पाला अर्पण करण्यासाठी सोपे पान गुलकंद मोदक बनवण्याची पद्धत सांगत आहोत.

लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून मिक्स ड्राय फ्रूट्सची पावडर

  • 2 टीस्पून नारळ पावडर

  • अर्धा टीस्पून बडीशेप पावडर

  • १ ते २ चमचे तुटी फ्रुटी

  • 6 ते 7 चमचे गुलकंद

  • २-३ चमचे देशी तूप

  • 1 कप कंडेन्स्ड दूध

  • 6 ते 7 सुपारीची पाने

  • हिरवा फूड कलर

असे करा तयार

  • यासाठी सर्वप्रथम आर्धी पानं बारीक करून त्यात कंडेन्स्ड मिल्क मिसळा.

  • आता उरलेली पाने बारीक चिरून या मिश्रणात मिसळा.

  • यानंतर कढईत तूप टाकून गॅसवर गरम करायला ठेवा.

  • तूप गरम झाल्यावर त्यात खोबऱ्याचे किस टाका आणि काही मिनिटे परतून घ्या.

  • यानंतर त्यात पान आणि कंडेन्स्ड मिल्कचे तयार मिश्रण घाला.

  • आता त्यात चिमूटभर हिरवा फूड कलर घाला.

  • मिश्रण व्यवस्थित शिजवा आणि थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.

  • आता त्यात गुलकंद, टुटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स आणि बडीशेप पावडर मिसळा.

  • सर्वकाही एकत्र केल्यानंतर, थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवा.

  • यानंतर मिश्रणाला मोदकाचा आकार देऊन तयार करा. अशा प्रकारे पाचव्या दिवशी गणपती बाप्पाला केलेला नैवेद्य तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

आईने माझी ती डायरीचं जाळून टाकली... ख्रिश्चन मुलाशी लग्न करण्याला कीर्ती सुरेशच्या घरच्यांचा होता विरोध; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : गोकुळच्या राजकारणात माजी सरन्यायाधीशांच्याही मताचा उल्लेख

लग्नानंतर ८ वर्षांनी झालेली मुलगी, आईने करिअरही सोडलं; ९ वर्षीय मुलीचा अचानक वर्गातच मृत्यू, VIDEO VIRAL

Pune-Kolhapur Highway Traffic Update : पुण्याहून पाच तासात कोल्हापूर! ट्रॅफिकचं टेन्शन घेऊ नका, हे नवे पर्यायी रस्ते चेक करा

SCROLL FOR NEXT