oats and ragi healthy modak recipe  Sakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi 2023 : ओट्स-नाचणीचे हेल्दी मोदक, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी VIDEO

जाणून घेऊया ओट्स- नाचणीच्या मोदकाची हेल्दी रेसिपी

Harshada Shirsekar

गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांत भाविक बाप्पाची मनोभावे सेवा करतात. बाप्पाच्या आवडीच्या नैवेद्यामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची गणेशभक्तांकडून पुरेपूर काळजी घेतली जाते. पण बाप्पासाठी केलेल्या प्रसाद, नैवेद्यावर भक्तांकडून ताव मारला जातो. 

अशा प्रकारे काही जणांकडून या दहा दिवसांत डाएट व वर्कआऊटकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जातं. पण चिंता करू नका, सणउत्सवादरम्यानही आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर हेल्दी मोदक किंवा प्रसाद आपण तयार करू शकता. यानिमित्ताने जाणून घेऊया ओट्स- नाचणीच्या मोदकाची हेल्दी रेसिपी 

डाएट मोदकाचे सारण तयार करण्यासाठी लागणारी सामग्री - 

ओट्स - अर्धी वाटी, तूप - एक चमचा, दूध - अर्धा ते पाऊण वाटी, बारीक चिरलेले खजूर - पाच ते सहा, बारीक चिरलेले अंजीर - दोन, अक्रोडाचे काप - दोन चमचे, भाजलेली खसखस - एक चमचा, वेलची पूड

उकडीचे साहित्य :

नाचणी पीठ - एक वाटी, दूध - दोन चमचे, तूप - एक चमचा, पाणी - एक वाटी, चिमूटभर मीठ

पाककृती -

  • मोदकाचे सारण असे करा तयार

  • तुपामध्ये ओट्स भाजून घ्या. थोड्या वेळाने त्यात खजूर, अंजीर, आणि खसखसही परतून घ्या. 

  • कढईमध्ये थोडेथोडे दूध देखील मिक्स करावे.

  • मिश्रण थोडेसे घट्ट झाले की वेलचीची पूड, अक्रोडाचे काप मिक्स करावे.

  • आता मिश्रण थंड होण्यास ठेवून द्या.

उकड कशी तयार करावी? 

  • पाणी, दूध, तूप, मीठ उकळत ठेवा.

  • पाण्यास उकळ येण्यास सुरुवात होताच त्यात नाचणीचे पीठ मिक्स करावे.

  • सर्व सामग्री व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्या.

  • गॅस बंद करून मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवा.

असे तयार करा मोदक

  • नाचणीची उकड नीट मळून घ्या व त्याचे लहान गोळे तयार करा.

  • पिठाचे गोळे नीट लाटून त्यात सारण भरा.

  • पारीला कळ्या पाडून मोदकाचा आकार द्यावा.

  • मोदक तयार झाल्यानंतर १० मिनिटे वाफवून घ्यावेत.

  • तयार झाले आहेत डाएट मोदक.

  • आता गरमागरम मोदकांचा आस्वाद घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT