Ganesh Chaturthi 2023 Sakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi 2023 : गणेशास लाल रंग प्रिय का?

Ganesh Chaturthi 2023 : गणेशास लाल रंगाचे फूल, लाल वस्त्र अर्पण केले जाते. कारण…

सकाळ डिजिटल टीम

- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

Ganesh Chaturthi 2023 : गणेशास लाल रंगाचे फुल, लाल वस्त्र अर्पण केले जाते. तसेच गणेश मूर्तीचा रंग लाल का असावा! किंबहुना गणेशास लाल रंग जास्त प्रिय का आहे? अथर्वशीर्षात 'रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्l रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्ll' असे वर्णन आलेले आहे. 

अर्थात लाल वस्त्र, लाल गंध, लाल फुले इत्यादी लाल रंगाच्या गोष्टी गणेशास प्रिय आहेत, असे अथर्वशीर्षावरून दिसून येते. याचे कारण असे की, गणपतीचा वास देहामध्ये मूलाधार चक्रामध्ये आहे, असे अथर्वशीर्ष सांगते. जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनुसार मनुष्यदेहातसुद्धा देवतांचा वास विशिष्ट ठिकाणी असतो, असे योगशास्त्र सांगते. 

'किंच हेमनिभे चक्रे मूलाधारे चतुर्दलेl

गणेशोस्ति तथाचक्रे स्वाधिष्ठानकसंज्ञकेll

षड्दले विद्रुमाकारे ब्रह्मास्ति मणिपूरकेl

द्विपंचदलसंयुक्ते नीलवर्ण स्थितो हरि: ll'

अर्थात आपल्या देहात सहा प्रकारची चक्रे अस्तित्वात आहेत. योगशास्त्रानुसार मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र अशी ती षट्चक्रे आहेत. षट्चक्रांमधील मूलाधार चक्रात गणेशाचे, स्वाधिष्ठान चक्रात ब्रह्मदेव, मणिपूर चक्रात विष्णू इत्यादी देवतांचा वास असते. 'त्वं मूलाधारस्थितोसि नित्यम्' असे अथर्वशीर्षात म्हटलेले आहे.

मूलाधार चक्रात श्री गणेशाचे वास्तव्य आहे. मूलाधार चक्राचा योगशास्त्रीय दृष्ट्या विचार केल्यास मूलाधार चक्रामध्ये जे स्वस्तिक आहे, असे सांगितलेले आहे, त्या स्वस्तिकाचा रंग लाल असतो. तसेच 'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ' या गणेशाच्या ध्यानामध्ये देखील उगवत्या कोटी सूर्यांप्रमाणे लाल रंगाचा गणेश असे वर्णन आलेले असल्यामुळे गणेशास लाल रंग अत्यंत प्रिय आहे. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT