Ganesh Chaturthi 2023  
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi: आज होणार बाप्पाचे आगमन, गणेशमूर्तीची घरी स्थापना कशी करावी अन् शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या

गणपतीची स्थापना गणेश चतुर्थीस सूर्योदयापासून ते मध्यान्ह काळ संपेपर्यंत म्हणजे अंदाजे दुपारी १.३० वाजेपर्यंत केव्हाही करता येते.

गौरव देशपांडे

Ganesh Chaturthi 2023 : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीनिमित्त घरी स्थापन केली जाणारी गणेशमूर्ती असावी याबद्दल मूर्तिशास्त्र व धर्मशास्त्रात विवेचन केले आहे.

'अंगुष्ठपर्वादारभ्य वितस्तिं यावदेव तु । गृहेषु प्रतिमा कार्यानाधिका शस्यते बुधैः॥'

अर्थात, अंगठ्याच्या पेराच्या मापापासून ते १२ अंगुल परिमाण असलेली मूर्ती घरी स्थापन करावी. त्यापेक्षा मोठी मूर्ती स्थापन करू नये. गणपतीची मूर्ती शाडूमातीची व सुबक असावी. पद्मासन घातलेली, लाल वस्त्र परिधान केलेली गणेशमूर्ती जास्त प्रशस्त सांगितलेली आहे. गणपतीची स्थापना गणेश चतुर्थीस सूर्योदयापासून ते मध्यान्ह काळ संपेपर्यंत म्हणजे अंदाजे दुपारी १.३० वाजेपर्यंत केव्हाही करता येते.

प्रत्येक देवतेचे पूजन करताना त्या त्या देवतेसाठी स्वतंत्र अष्टगंध सांगितले आहे. अष्टगंध म्हणजे आठ प्रकारच्या सुगंघी वनस्पती आदींचे मिश्रण होय. गणेशाचे पूजन करताना 'केशरं रोचना मांसी कस्तुरी अगरुस्तथा। सुचंदनं तथा मुस्था रक्तचंदनमष्टमम् ॥' अर्थात गणपतीचे अष्टगंध तयार करताना केशर, गोरोचन, जटामांसी, कस्तुरी, कृष्णागुरू, चंदन, नागरमोथा व रक्तचंदन हे आठ जिन्नस वापरावेत असे सांगितलेले आहे.

तसेच 'चिंतामणीकल्प' या प्राचीन ग्रंथात गणेश चतुर्थीपासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत मोरयाला कोणते विशेष नैवेद्य दाखवावेत, त्याविषयी माहिती दिलेली आहे. विशिष्ट नैवेद्य प्रत्येक तिथीस गणेशास अर्पण केल्याने गणरायाची विशेष कृपा संपादन करण्यास मदत होते. हे नैवेद्य पुढीलप्रमाणे: चतुर्थीस अनारसे, पंचमीस उडदाच्या डाळीचे वडे, षष्ठीस पुऱ्या, सप्तमीस घारगे, अष्टमीस-पंचपक्वानांचे जेवण, नवमीस पायस (तांदुळाची खीर), दशमीस-दूध, एकादशीस-पंचखाद्य, द्वादशीस केळी, त्रयोदशीस डाळिंब, अनंतचतुर्दशीस जांभुळ याप्रमाणे नैवेद्य दाखवावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT