modak  sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi Recipe: ही रेसिपी वापरुन झटपट तयार करा गव्हाच्या पिठाचे स्वादिष्ट मोदक...

गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक कसे तयार करायचे? जाणून घ्या रेसिपी

Aishwarya Musale

गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील एक मोठा उत्सव आहे. प्रत्येकजण बाप्पाच्या सेवेत मग्न असतो. बाप्पासाठी त्याच्या आवडीच्या वस्तू तयार केल्या जातात. मोदक हे त्यापैकीच एक. असे मानले जाते की गणपतीला मोदक खूप आवडतात आणि त्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते.

उकडीचे मोदक महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत, म्हणून आम्ही तुमच्यासाठी ही रेसिपी आणली आहे. ही खास रेसिपी सुप्रसिद्ध शेफ अजय चोप्राने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांनी सांगितले आहे की ते स्टीम किंवा फ्राय करून खाऊ शकतात.

लागणारे साहित्य

  • २ कप गव्हाचे पीठ

  • २ चमचे तूप

  • एक चिमूटभर मीठ

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • सारणसाठी १ चमचा तूप

  • 1 टीस्पून काजू

  • 1 टेबलस्पून मनुका

  • 1 टेबलस्पून खसखस

  • २ कप किसलेले खोबरे

  • १ वाटी गूळ

  • वेलची पावडर

  • तळण्यासाठी तेल

गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्याची पद्धत-

  • सर्व प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, चिमूटभर मीठ आणि तूप घालून मिक्स करा.

  • यानंतर त्यात थोडे पाणी घालून छान मऊ आणि घट्ट पीठ मळून घ्या. ते ओल्या कापडाने झाकून 5-10 मिनिटे सोडा.

  • आता कढई गरम करून त्यात थोडं तूप टाका, काजू आणि मनुका घालून काही सेकंद परतून घ्या. त्यात किसलेले खोबरे घालून काही सेकंद परतावे. आता खसखस ​​घाला आणि ढवळत राहा आणि शेवटी बारीक चिरलेला गूळ घाला. गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.

  • झाकलेले पीठ पुन्हा एकदा २० सेकंद मळून घ्या आणि छोटे गोळे घेऊन पुरीसारखे लाटून घ्या.

  • गोल कटर वापरुन, त्यातून लहान सर्कल बनवा. हे मोदकासाठी बेस म्हणून काम करेल. आता त्यावर स्टफिंग भरा.

  • बोटांच्या साहाय्याने प्लीट तयार करून मोदक बंद करा. मोदक तयार आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तळून किंवा स्टीम करू शकता.

  • तळलेले आणि स्टीम केलेले दोन्ही मोदकांना चकचकीत फिनिश देण्यासाठी वर तूप लावा. हे मोदक एका सुंदर ताटात ठेवा आणि गणेशाला अर्पण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT