Ukadiche Modak esakal
Ganesh Chaturthi Festival

Ukadiche Modak : बाप्पासाठी बनवलेले उकडीचे मोदक २४ तास मऊ लुसलुशीत राहावे यासाठी त्यात घाला हा 1 पदार्थ

उकडीच्या मोदकाला कळ्या पाडण्याच्यासुद्धा तीन पद्धती जाणून घेऊ

साक्षी राऊत

Bappa's Special Ukadiche Modak Recipe : बाप्पाच्या आगमनाची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु आहे. त्यातल्या त्यात बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ मोदक बनवण्यासाठीची तयारी घरोघरी चाललेली असेल. उकडीचे मोदक खायला फार चविष्ट लागतात. मात्र अनेकांना ते जमत नाही. त्यामागे योग्य पद्धत माहिती नसणे हे एक महत्वाचं कारण असू शकतं. शिवाय उकडीच्या मोदकाला कळ्या पाडण्याच्यासुद्धा तीन पद्धती जाणून घेऊयात.

सर्वप्रथम आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी एक कढई घ्या. गॅसवर ठेवून त्यात तूप घाला. तूप गरम झाले की आता त्यात एक वाटी खोबऱ्याचा किस घाला. आता हा खोबऱ्याचा किस आपण १ मिनिट कढईत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात अर्धा वाटी गूळ घाला. एक वाटी खोबऱ्याच्या किसासाठी अर्धा कप गूळ हे अगदी बरोबर प्रमाण आहे. गूळ टाकल्यानंतर कढईतील सारण थोडं पातळसर होतं. त्याला थोडं सुटसुटीत झाल्यावर कढईतून काढून घ्या. आणि थंड होण्यासाठी ठेवा. आता थंड झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाका.

सारण थंड होतपर्यंत आपण उकळ काढून घेऊया. उकळ काढण्यासाठी जितक्या प्रमाणात पिठ असेल तेवढ्याच प्रमाणात पाणी घ्या. हे पाणी गॅसवर गरम करताना त्यात एक चमचा तूप, चिमूटभर मीठ आणि त्यात अर्धा चमचा साखर घाला. साखर घातल्यामुळे आपल्या मोदकाला फार चांगली चव येते. आणि मोदक अगदी दोन दिवस मऊ लुसलुशीत राहतात. आता या पाण्याला उकड आली की त्यात तांदळाचे पीठ घाला. आता हे पीठ थोडं परतून घेतल्यानंतर लगेच गरम मळून घेऊ नका. त्याला थोडे कोमट होऊ द्या. नंतर मळून घ्या.

आता पिठाचा एक गोळा घ्या आणि त्याची पातळ पारी हाताने किंवा कोरपाटावर बनवून घ्या. आता मोदकाच्या कळ्या पाडण्यासाठी कळ्या पाडण्यासाठी अंगठा आणि मधल्या बोटात पिठाची चिमटी घेऊन बाहेरच्या साइडने प्रेस करून घ्या. आता कळ्या पाडून झाल्यात की त्यात मावेल एवढे सारण भरून हलक्या हाताने प्रेस करत जवळजवळ घेऊन या. आणि वरच्या बाजूने त्याचं टोप व्यवस्थित बंद करायचं आहे.

मोदक मऊ होण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा?

तुम्ही बाजारातून तांदळाचे पिठ विकत आणणार असाल तर त्यात काही तांदळाचा ऑप्शन नसतो. पण जर तुम्ही घरीच पीठ बनवणार असाल तर कोणता तांदूळ निवडावा हा प्रश्न बऱ्याच मैत्रिणींना पडतो. त्याचं उत्तर असं आहे की, तांदळाचे मोदक उकड काढून करावे लागतात. जर तुमची उकड चांगली चिकट, मऊ बनली नाही. तर मोदकच्या पाऱ्याही चिरतात. त्यासाठी तुम्ही बासमती आणि आंबे मोहोर तांदूळ घेऊ शकता. या तांदळांच्या पिठाने मोदक जास्तवेळ मऊ राहण्यास मदत होते.

कळ्या पाडण्याच्या दुसऱ्या पद्धती

मोदकाच्या कळ्या तुम्हाला हाताने पाडता येत नसेल तर साचा घेऊन त्यात पारी घाला आणि मावेल एवढे सारण भरून खालचे होलसुद्धा पिठ लावून बंद करून घ्या. अगदी झटपट तुमचा मोदक बनून तयार होईल.

तिसरी पद्धत

पारी घेऊन तिला वाटीत ठेवायची. मग त्यात सारण भरून हाताने कडेकडे त्याला जोडून बंद करायचं. तुमचा मोदक अगदी सहज तयार होईल.

आता तुम्हाला एका पातेल्यात पाणी गरम करून एका कापडात हे सगळे मोदक वाफवून घ्यायचे आहेत. १०-१५ मिनिटे हे मोदक उकडल्यानंतर एकदा चेक करून बघा. मोदक हाताला चिटकत नसेल तर तुमचे मऊ लुसलुशीत मोदक तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT