aurangabad-digitial-idol
aurangabad-digitial-idol 
ganesh darshan

यंदा सोशल मीडियावरही गणेशोत्सवाची धूम

संदीप लांडगे

औरंगाबाद - पूर्वी गणपती बसवला की त्याला लायटिंग, झिरमाळ्या, विविध फुलांची सजावट असायची; मात्र बदलत्या काळात डिजिटलायझेशनमुळे सजावटीमध्ये विविधता आली आहे. सोशल मीडियावरही आपल्या घरी बसवलेला गणपती कशा पद्धतीने सजवला आहे, त्याचे व्हिडिओ, छायाचित्र, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्रामवर अपलोड करून लाइक्‍स मिळवले जात आहेत. दरम्यान, अनेक मंडळे आरतीचे फेसबुक लाइव्ह करीत आहेत तर काही ठिकाणी मोबाईलवर महामंत्र जप ऐकायला मिळत आहे. 

शहरातील विविध गणेश मंडळांनी यंदा विविध सजावटी केल्या असल्या तरी त्यामध्ये डिजिटल स्क्रीनचा वापर करून गणपतीला अंतराळात पाठवले आहे. दुसरीकडे डिजिटलायझेशनमुळे गणपतीची सर्व गाणी आता ऑनलाइनच्या माध्यमातून मिळत असल्याने पेन ड्राइव्ह, विविध मोबाईल ॲप्सला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी सीडी, डीव्हीडीला मात्र अडगळीची जागा मिळाली आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी काही कंपन्या खास गणपतीची लोकप्रिय गाण्यांच्या चालीवरील जुनी गाणी नव्या डीजे स्वरूपात तयार करून व्हायरल होताना दिसत आहेत. 

मोबाईलच्या प्लेस्टोअरवर गाणी, गणपतीचे थ्रीडी, फोरडी फोटो, आरती, भक्तिगीते, डेकोरेशन उपलब्ध असल्याने याचा हवे तेव्हा मंडळाने बसवलेल्या गणपतीच्या पाठीमागे डिजिटल स्क्रीन बदलून आरास, डेकोरेशन बदलता येत आहे. त्यामुळे गणपतीला आधुनिकतेची जोड मिळाल्याने यंदा गणपती उत्सव आधुनिक बनला आहे.

डिजिटल स्क्रीनवर गणपती 
आधुनिकतेच्या काळात सर्व काही सहज शक्‍य झाले आहे. बऱ्याच ठिकाणी गणपतीची मूर्ती न बसवता फक्त डिजिटल स्क्रीन लावून फोरडी, फाइव्ह डी स्वरूपात गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. या स्वरूपातील गणपतीमुळे प्रत्यक्षात गणपतीचे स्वरूप बदलणे, डेकोरेशन आपोआप बदलत आहे. त्यामुळे दहा दिवस हजारो प्रकारचे डेकोरेशन एका क्षणात बदलताना दिसत आहे. 

वॉलपेपर, प्रोफाईल पिक्‍चरवर गणपती 
व्हॉट्‌सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर अनेकांच्या प्रोफाईल पेजवर घरी बसवलेल्या गणपतीचा फोटो दिसत आहे. अनेकांनी शेअरचॅट, टिकटॉकवर घरी बसवलेल्या गणपतीचे व्हिडिओ अपलोड करून त्याला भक्तिगीतांची चाल लावून लाखोंच्या आसपास लाइक्‍स मिळवले आहेत. काही नेटिझन्सनी सोशल मीडियावर गणपतीचे फोटो स्टेटस म्हणून ठेवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT