Ganesh Visarjan 2025: Sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Visarjan 2025: गणपती उत्सवात नाचून पाय थकले? 'या' उपायांनी मिळवा पाय दुखण्यापासून मुक्ती

Ganesh Visarjan 2025: गणेशभक्त गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करतात. ढोल -ताशा आणि डीजेच्या तालावर नाचल्यानंतर पाय आणि अंग खुप दुखत असेल तर घरगुती उपाय करून लगेच आराम मिळू शकतो.

पुजा बोनकिले

गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला करण्यात येते.

ज्याप्रमाणे वाजत-गाजत ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन होते त्याचप्रमाणे गणेस विसर्जन देखील ढोल-ताशाच्या गजरात होते.

पण नंतर घरी जाऊन पाय आणि अंगदुखीचा त्रास होतो.

Foot Pain Relief: गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला करण्यात येते. या दिवशी गणरायाच्या मूर्तीचे विधीवत पूजा करून विसर्जन केले जाते. गणेश भक्तासांठी हा उत्साहाचा सोहळाच असतो.

ज्याप्रमाणे वाजत-गाजत ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन होते त्याचप्रमाणे गणेस विसर्जन देखील ढोल-ताशाच्या गजरात होते. गणपती मिरवणुकीत भान हरवून लोक ढोल ताशांच्या आणि डीजेच्या तालावर नाचतात.

पण नंतर घरी जाऊन पाय आणि अंगदुखीचा त्रास होतो. इतकेच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर शरीर अकडल्यासारखे वाटते. अशावेळी पायाचे दुखणे आणि अंगदुखी कमी करण्यासाठी पुढील घरगुती उपाय करू शकता.

कोमट पाणी आणि मीठाचा वापर

गणपती मिरवणुकीत नाचून पाय दुखत असेल तर कोमट पाणी आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी एका बादलीत कोमट पाणी घ्यावे. नतंर त्यात मीठ टाकावे आणि त्यात पाय बुडवून बसावे. यामुळे शरीरातील संपुर्ण थकवा कमी होईल.

कोमट तेलाचा वापर

ढोल ताशाच्या तालावर नाचून पाय आणि अंग दुखत असेल तर कोमट तेलाने मसाज करू शकता. कोमट तेलाने मसाज केल्याने शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. तसेच होणाऱ्या वेदना कमी होतात. यासाठी तिळाचे तेल वापरू शकता.

हळदीचे दूध

गणपती मिरवणुकीत नाचून आणि सारखे उभे राहून पाय आणि अंगदुखी होत असेल तर तुम्ही हळदीच्या दूधाचे सेवन करू शकता. हळदीमध्ये असलेले घटक शरीराच्या वेदना कमी करतात आणि रोगप्रतिकराशक्ती वाढवतात.

स्ट्रेचिंग

गणपती मिरवणूकीच डीजे च्या तालावर नाचून पाय आणि अंग दुखत असेल तर स्ट्रेचिंग करावे. तुम्ही घरीच काही सोपे स्ट्रेचिंग करून स्नायू मोकळे करू शकता.

आल्याचा चहा

गणपती मिरवणुकीत नाचून थकवा आला असेल आणि अंग दुखत असेल तर आल्याचा चहाचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि थकवा कमी होईल. तसेच आल्यामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात.

बर्फाचे तुकडे

गणपती मिरवणुकीमध्ये नाचून पायावर सुज आली असेल तर बर्फाचा वापर करू शकता. यासाठी एका सुती कापडात बर्फाचे तुकडे घ्यावे आणि ज्या भागावर सुज आहे त्यावर फिरवावे. यामुळे सुज कमी होईल आणि आराम मिळेल.

गणपती मिरवणुकीनंतर पाय दुखण्याची कारणे काय आहेत?

गणपती मिरवणुकीत जास्त वेळ नाचणे, उभे राहणे किंवा अयोग्य पादत्राणे वापरणे यामुळे पायांवर ताण येऊन दुखणे, सूज किंवा थकवा जाणवू शकतो.

पाय दुखण्यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?

पाय गरम पाण्यात बुडवावे, हलकी मालिश करावी, बर्फाचा शेक द्यावा आणि पाय उंचावर ठेवून विश्रांती घ्यावी. तसेच, तुळशीचा चहा किंवा हळदीचे दूध प्यायल्याने सूज कमी होऊ शकते.

पाय दुखणे टाळण्यासाठी मिरवणुकीदरम्यान काय काळजी घ्यावी?

आरामदायी आणि योग्य पादत्राणे घालावीत, मधूनमधून विश्रांती घ्यावी, पाणी पिऊन हायड्रेटेड राहावे आणि जास्त ताण पडणारे नृत्य टाळावे.


पाय दुखणे बरे न झाल्यास काय करावे?

जर पाय दुखणे काही दिवसांत बरे न झाल्यास, सूज किंवा लालसरपणा दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने व्यायाम किंवा उपचार घ्यावेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

विसर्जन न होताच परतणार गणरायाची मूर्ती, असा निर्णय घेण्यामागची मंडळाची नेमकी भावना काय? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळचा राजा लालबाग येथे दाखल

Daund Crime : दौंड येथे तरूणाचा निर्घृण खून; चार संशयित आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT