Ganeshotsav 2022 
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022 : भडकंब्यातील जोशी कुटुंबीयांकडे गणपती नवरात्रोत्सव

पिढ्यान्‌पिढ्या आगळी परंपरा ; भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून उत्सवाचा आरंभ

अमित पंडित

साखरपा : येथील नजीकच्या भडकंब्यातील जोशी कुटुंबीय गणपती नवरात्रोत्सवाची आगळीवेगळी परंपरा जपत आहेत. भडकंबा दत्तवाडी येथील पर्शुराम जोशी व कुटुंबीय पिढ्यान्‌पिढ्या गणेशोत्सवाची ही आगळीवेगळी परंपरा जोपासत आहेत. साखरपा पंचक्रोशीत भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच सर्वप्रथम आगमन होणारा हा गणपती म्हणून याची ओळख आहे. प्रतिपदेपासून गौरी गणपती विसर्जनापर्यंत गणपतीच्या नवरात्रोत्सवाची या कुटुंबाची परंपरा आहे. प्रतिपदेपासून सुरू होऊन गौरी विसर्जनापर्यंत सुरू राहणारा हा गणेशोत्सव नऊ दिवसांमुळे गणेश नवरात्रोत्सव म्हणूनही ओळखला जातो.

प्रतिपदेला ब्रह्मवृदांच्या मंत्रोच्चारात या उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. तसेच गणपती अथर्वशीर्षाच्या एक हजार आवृत्या ब्रह्मवृदांमार्फत आळवल्या जातात आणि जोशी कुटुंबासमवेतच संपूर्ण पंचक्रोशीतील गणेशोत्सवाचा आरंभ होतो. मुळचे कृष्णाकाठच्या कराड येथील असणाऱ्या जोशींच्या अनेक पिढ्या कोकणात वास्तव्यास आहेत.

मुळचे ज्योतिषी आणि अपभ्रंशाने जोशी झालेल्या कुटुंबावर गणपतीचा विशेष वरदहस्त आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. देवघरातील पंचधातूंच्या ठसठशीत गणेशमूर्ती व दुर्मिळ असे नर्मदा गणपतीदेखील यांच्याकडे पाहावयास मिळतात. सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार संतोष जामसंडेकर यांच्या हस्तकौशल्यातून ही मूर्ती तयार होते. जोशी कुटुंबातील माहेरवाशिणी, सुना, नातवंडे आपले नोकरी व्यवसाय सांभाळून गणेशाच्या दर्शनाला आवर्जून उपस्थित राहतात. जोशी घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घराण्याच्या देव्हार्‍यात पंचधातूंची गणेशमूर्ती आहे.

तसेच दुर्मिळ असा नर्मदा गणेशही आहे. पुराण काळात गणेशाचे शीर धडापासून विलग करण्यात आल्यावर ते नर्मदा नदीत पडले आणि त्या रक्ताने नर्मदेतील दगड पावन झाले. त्यांनाच नर्मदा गणेश, असे संबोधले गेले. अशाचपैकी एक गणेश जोशी यांच्या देव्हाऱ्यात आहे. याचीही विधिवत पूजा उत्सवादरम्यान केली जाते.

आमच्या घरातील हा गणेशोत्सव उत्तरोत्तर वाढत जावो व जोशी कुटुंबीयांप्रमाणेच सर्वांच्या इच्छांची पूर्तता होवो हेच आमचे नेहमी मागणे गणरायाकडे असते.

- प्रवीण जोशी, भडकंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT