Ganeshotsav 2022 Kolhapur 
Ganesh Chaturti Festival

Ganeshotsav 2022 : बाप्पांचा चैतन्य सोहळा उद्यापासून

सवाद्य मिरवणुकांनी गणेश आगमनाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना आणि कोरोनोत्तर सर्व विघ्नांवर मात करत यंदा विघ्नहर्त्या बाप्पांच्या आगमनाला पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला आहे. घरगुती बाप्पांचा यंदा सहा दिवसांचा, तर सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचा मुक्काम नऊ दिवसांचा राहणार आहे. दहा दिवसांच्या या चैतन्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारपेठेतही मोठा उत्साह असून, खरेदीला उधाण आले आहे.

बहुतांश सार्वजनिक मंडळांनी आजपासून गणेश आगमनाला प्रारंभ केला. या निमित्ताने पारंपरिक वाद्यांसह लेसर शोचा झगमगाट अनुभवायला मिळाला. गंगावेस, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली आदी परिसरांत वाद्य पथके हजेरी लावू लागली आहेत. गौराईच्या पारंपरिक खेळांनी आता रात्री जागू लागल्या आहेत. महिलांच्या या आनंदोत्सवाला बाप्पांच्या आगमनाबरोबरच आणखी उधाण येणार आहे.

खरेदीसाठी गर्दीचा महापूर

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोड, पापाची तिकटी, बिंदू चौक, राजारामपुरी आदी परिसरांत कोल्हापूरकरांनी खरेदीसाठी सहकुटुंब गर्दी केली आहे. या परिसरात अगदी पाच रुपयांपासून सजावटीचे विविध साहित्य उपलब्ध आहेत. दुपारनंतर मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने सायंकाळी या परिसरात गर्दीचा महापूर अनुभवायला मिळू लागला आहे. त्यामुळे या सर्व परिसरांना जोडणाऱ्या मार्गावर वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस् लावून चोख बंदोबस्त ठेवला आहे.

मानाच्या गणपतींचे आज आगमन

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मानाच्या गणपतीचे आगमन उद्या (मंगळवारी) सायंकाळी सात वाजता पापाची तिकटी येथून होणार आहे. करवीर नाद ढोल-ताशा पथक, सुप्रभात बॅंडच्या निनादात आगमन मिरवणूक होईल. जुना राजवाडा येथील खजिन्यावरील मानाच्या गणपतीचे सायंकाळी चार वाजता आगमन होणार आहे. राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, सायंकाळी चार वाजता मंडळाची आगमन मिरवणूक होणार आहे. शंभर वादकांचे केसरी ढोल पथक आणि विविधरंगी प्रकाशझोतांच्या साक्षीने ही मिरवणूक होईल. पूलगल्ली तालमीने यंदा ‘ओढ्यावरील सिद्घिविनायक’ रूपातील भव्य २१ फुटी मूर्ती साकारली असून, रात्री नऊला पारंपरिक वाद्यांच्या गजरात या मूर्तीचे अनावरण होईल.

महागणपती उद्या दर्शनासाठी खुला

शिवाजी चौक तरुण मंडळाचा २१ फुटी महागणपती यंदा बुधवारी (ता. ३१) पहिल्याच दिवशी दर्शनासाठी खुला होणार आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महागणपती दर्शनासाठी खुला केला जायचा; पण यंदा पहिल्याच दिवशी दर्शनासाठी महागणपती खुला करण्याचा निर्णय घेतला. २४ तास मूर्ती दर्शनासाठी खुली राहणार असल्याचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद वळंजू यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT