Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022 
Ganesh Chaturti Festival

Ganeshotsav 2022 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांचा आवडता लाडका बाप्पाच्या आगमनाची तयारी शहर आणि जिल्ह्यात जोरदार सुरू झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला असून विविध भागातील गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे मुर्तीशाळेतही गणेशाच्या मुर्तीवर अंतिम हात फिरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनीही बाजारपेठ सजली आहे.

कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. यंदाच्या वर्षी राज्य सरकारने नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारी करत आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनासह महापालिका, नगरपालिका यांनीही देखील नियोजन केले आहे. त्याचबरोबर पोलिस विभागाच्या वतीने पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेण्यात येत असून त्यात गणेशोत्सव नियमांचे पालन करून शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील गणेश मंडळांना देखील मंडप उभारणी करताना रस्त्यावरील वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्याचे सूचना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक तसेच शासकीय मालमत्तेस हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करावे, पर्यावरण पूरक देखावे सजावट करून जनजागृती करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध

जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये ता. ३१ ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन ते ता. नऊ सप्टेंबर रोजी श्रीची विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक, धारक तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे ताब्यातील डॉल्बी सिस्टीम वापरात किंवा उपयोगात आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच आदेश काढण्यात आले आहेत.

वर्गणीसाठी मंडळांनी परवाना घ्यावा

गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने ता. ३१ ऑगस्टपर्यंत रविवार व शासकीय सुटी वगळून कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन नांदेडचे धर्मादाय उपआयुक्त किशोर मसने यांनी केले आहे. गणेश मंडळांना ही परवानगी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धती देण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT