Ganeshotsav : कसबा गणपती पुण्याचे ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती ओळखला जातो 
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022 : पुण्यातील प्राचीन गणेशमंदिरे जाणून घ्या माहिती - Photo

गणेशोत्सव : गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन

ओंकार जाधव

गणेशोत्सव... भारतीय संस्कृतीतील ऊर्जा वाढविणारा उत्सव. कुणासाठी विघ्नहर्ता, सुखकर्ता, कुणासाठी दुःखहर्ता, तर लहान मुलांसाठी लाडका बाप्पा. बुधवारपासून या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया पुण्यातील प्राचीन गणेश मंदिरांबाबत...

त्रिशुंड्या गणपती (सोमवार पेठ) तीन सोंड असल्याने त्रिशुंड या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे.
मातीचा गणपती (नारायण पेठ) कै. शिवरामपंत श्रोत्री यांना मुठा नदीतून वाहत आलेल्या मातीत ही मूर्ती मिळाली, म्हणून यांस मातीचा गणपती म्हणतात.
मोदी गणपती (नारायण पेठ) या मंदिराचे नाव श्री सिद्धिविनायक मंदिर होते, पण नंतर मोदी बागेत मंदिर असल्याने ‘मोदी गणपती’ असे नाव रूढ झाले.
तळ्यातला गणपती (सारसबाग) सारसबागेतील गणपती हा तलावाच्या बेटावर असल्याने ‘तळ्यातला गणपती’ म्हणून ओळखला जातो.
गुंडाचा गणपती (कसबा) पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता, ‘त्याच्या घराजवळील गणपती’ म्हणून हा ‘गुंडाचा गणपती’ नावाने प्रसिद्ध आहे.
श्री वरद गुपचूप गणपती (शनिवार पेठ) चिंचवड येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी १८९२ मध्ये या देवस्थानाची उभारणी केली.
दशभुजा गणपती (कोथरूड) पुण्यात दशभुजा गणेशाच्या एकूण तीन मूर्ती आहेत, त्यापैकी कोथरूडची ही मूर्ती सर्वांत मोठी आहे.
फडके गणपती (सिंहगड रस्ता) सरदार फडके यांनी स्थापन केल्यामुळे हे मंदिर ‘फडके गणपती’ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने आहे
चिमण्या गणपती (सदाशिव पेठ) पूर्वीच्या काळी या गणपतीपुढे तांदूळ टिपण्यासाठी खूप चिमण्या येत असत, त्यामुळे या गणपतीला ‘चिमण्या गणपती’ असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT