Ganeshotsav 2022 
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022 : गणेशपूजेसाठी २१ प्रकारच्या पत्रींचा अभ्यास

पुण्यातील ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक डॉ. विनया घाटे यांनी ‘पत्रपूजा’ या विषयावर प्रबंध लिहिला आहे

- नीला शर्मा

पुण्यातील ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक डॉ. विनया घाटे यांनी ‘पत्रपूजा’ या विषयावर प्रबंध लिहिला आहे. वनस्पती वर्गीकरण शास्त्र व लोकविज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. गणेशपूजेतील विशिष्ट प्रकारच्या २१ पत्रींमागील परंपरा व आजच्या काळात या वनस्पतींच्या संवर्धनाचं महत्त्व, यासंबंधी त्या जनजागृती करतात.

- नीला शर्मा

विनयाताई म्हणाल्या, ‘‘पत्रपूजेची संकल्पना वेदकाळापासून आहे. प्राचीन काळी सभोवताली हरित परिसर मोठ्या प्रमाणात असायचा. त्यातून निरनिराळ्या देवदेवतेला वाहण्यासाठी विशिष्ट पत्रींचे उल्लेख आढळतात. गणपतीसाठी २१, मंगला गौरीसाठी १६, हरितालिकेसाठी १६, अनंतपूजेसाठी १४ प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात. यांतील काही सगळ्यांमध्ये समान आहेत. पूर्वी वनस्पती मुबलक, त्या बहुसंख्यांना ओळखताही येत व लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे त्यांची पानं तोडणं निसर्गासाठी आजच्यासारखं घातक नव्हतं. आता मात्र मोठ्या प्रमाणातील शहरीकरणामुळे झालेली प्रचंड वृक्षतोड, उरलेल्या झाडांना पूजेसाठी ओरबाडणं व त्यांची नव्याने लागवड नगण्य प्रमाणात आदींचाही विचार केला पाहिजे. पूजेसाठी पत्री गोळा करण्यातूनच मला याबद्दल शास्त्रीय अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. ३७ वर्षे मी वनस्पती विज्ञानाचा सातत्याने अभ्यास करते आहे. याबाबत जनजागृतीसाठी व्याख्यानं, प्रदर्शनं, वनस्पतींचा परिचय फेरी आदी उपक्रमांमध्ये सहभागी असते.’’

विनयाताईंनी असंही सांगितलं की, सर्व पूजापत्रींमध्ये कोणते ना कोणते औषधी गुणधर्म असतात. पूर्वी त्या झाडांवरून खुडताना, नंतर मोजताना व सरतेशेवटी देवाला वाहताना होणारा स्पर्श महत्त्वाचा होता. त्यातून औषधी परिणाम शरीरावर होत असावा. मोठी माणसं तरुणांना व लहानांना या निमित्ताने विविध वनस्पतींची ओळख करून देत असत. त्यांच्या गुणधर्मांची माहिती लोकपरंपरेतून कित्येक पिढ्या दिली गेली.

गणेशपूजेत मालतीपत्र (मोगरा किंवा माधवीलता), भृंगराज (माका), बिल्व (बेल), श्वेत दूर्वा, बदरी (बोर), तुलसी, धत्तूर (धोत्रा), शमी, अपामार्ग (आघाडा), बृहती (डोरली), करवीर (कण्हेर), अर्कपत्र (रुई/मंदार), अर्जुन, विष्णुक्रांत

(शंखपुष्पी), दाडिम (डाळिंब), देवदार, मरुपत्र ( पांढरा मरवा), अश्वत्थ (पिंपळ), जातिपत्र ( जाई), केतकी ( केवडा) व अगस्ती (हादगा) या एकवीस वनस्पतींच्या पत्री वाहिल्या जातात. यांत वक्ष, झुडुपं, वेली व तृणवर्गीय वनस्पतींचा समावेश आहे. काळानुरूप सकारात्मक बदल म्हणून आपण यांतील जमतील तेवढ्या वनस्पती अंगणात, परसबागेत किंवा गच्चीवर कुंड्यांमधून जोपासल्या पाहिजेत. यामुळे पूजेच्या निमित्ताने त्यांची तोड थांबेल व संवर्धनाला मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुणे पोलिस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे, पाच नवीन पोलिस ठाणी मंजूर!

IND vs SA: बुमराहपाठोपाठ हार्दिकचीही खास सेंच्युरी! 'असा' पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय ऑलराऊंडर

Maharashtra Sand Mafia: वाळू माफियाविरोधात मोठी कारवाई लवकरच! मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन, काय म्हणाले?

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

SCROLL FOR NEXT