Ganeshotsav 2022 Esakal
Ganesh Chaturti Festival

Ganeshotsav 2022: गणपती बाप्पा मोरया का म्हटले जाते ? काय आहे या मागचा रंजक इतिहास

गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.

सकाळ डिजिटल टीम

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा”

हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात.गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आज राज्यभरात आगमन होणार आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच जण बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. गणपती आगमनच्या वेळेस आपण गणपती बाप्पा मोरया हा जयघोष करतो त्यामागे नेमका काय इतिहास आहे याचीच सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते या मागचा इतिहास हा फार कमी लोकांनाच माहिती आहे. गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे 600 वर्ष जुनी कहाणी आहे.

महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक परम भक्त होते. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते. मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असे सांगितले जाते की, वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले.

परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. एके दिवशी श्रीगणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. देवांनी त्यांना दर्शन दिले. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशाप्रकारे जोडले गेले आहे की, लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT