Jeshtha Gauri Pujan 2022 1
Ganesh Chaturthi Festival

Jeshtha Gauri Pujan 2022 : या वेळेत करा जेष्ठा गौरींचे आवाहन, जाणून घ्या शुभ मुहूर्त

सकाळ डिजिटल टीम

ज्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहीली जाते अशा लाडक्या गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आता वेध लागलेत ते जेष्ठा गौरी आगमनाचे. 3 सप्टेंबर शनिवार रोजी जेष्ठा गौरी आवाहन होणार असून पुढे गौरी पुजन आणि विसर्जन असा विधी असतो. या सर्व विधींसाठी शुभ मुहूर्त आपण जाणून घेवूया.

(Ganeshotsav Jyeshtha Gauri Pujan 2022 shubh muhurat)

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तीन दिवस जेष्ठा गौरींचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रात याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पुजन असेही म्हटले जाते. स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी यासह कुटूंबात सुख समृद्धीसाठी हा उत्सव साजरा केला जातो. ज्येष्ठा गौरी पूजन हे नक्षत्र आधारित पूजन आहे . भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन , ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर उस्थापन (विसर्जन) असते. यासाठी प्रत्येक दिवसाच्या पुजनासाठीचे मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत.

ज्येष्ठा गौरी आवाहन : 3 सप्टेंबर 2022, शनिवार

मुहूर्त : सुर्योदयापासून रात्री 10.56 वाजेपर्यंत

--------------

ज्येष्ठा गौरी पूजन : 4 सप्टेंबर 2022, रविवार

पूजन मुहूर्त : सकाळी 06.00 वाजेपासून सायंकाळी 06:39 वाजेपर्यंत

---------------

ज्येष्ठा गौरी विसर्जन : 5 सप्टेंबर 2022, सोमवार

उस्थापन (विसर्जन) मुहूर्त : सकाळी 06.01 वाजेपासून ते 08.30 वाजेपर्यंत

वर दिलेल्या माहितीनुसार तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी गौरी आवाहन, दुसऱ्या दिवशी गौरी पुजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

SCROLL FOR NEXT