Ganpati Visarjan sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganpati Visarjan 2023: सुख, शांती आणि सौभाग्य मिळवण्यासाठी गणपती विसर्जनाला करा 'या' मंत्राचा जप! जाणून घ्या पूजा विधी

गणेश विसर्जनाच्यावेळी देखील विधिवत पूजा करणे गरजेचे असते.

Aishwarya Musale

या वर्षी 28 सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. शास्रानुसार बाप्पाच्या पूजेबरोबरच त्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचाही नियम आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी बाप्पाला निरोप देण्यापूर्वी विधिवत गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाला पूर्ण विधीपूर्वक निरोप दिला जातो.

असे मानले जाते की, या दिवशी गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद देतो. गणेश विसर्जनाच्या वेळी कोणत्या मंत्राचा जप करायचा ते आम्ही तुम्हाला सांगतो

गणेश विसर्जनाच्या वेळी या मंत्राचा जप करा

ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥

गणेश विसर्जन 2023 शुभ मुहूर्त

28 सप्टेंबर रोजी सूर्योदयानंतर गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होईल. तसेच, तुम्ही ते सकाळी 10:42 ते दुपारी 03:11 आणि नंतर दुपारी 04:41 ते 09:12 दरम्यान करू शकता. या दिवशी भक्त आनंदाने गणपती बाप्पाला निरोप देतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची प्रार्थना करतात, जेणेकरून जीवनातील संकटे दूर होऊन सुख-समृद्धी येवो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT