Ganpati Visarjan Miravnuk laser shows esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganpati Visarjan : मिरवणुकीत 'लेझर शो'चे Video Recording करत असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा पडू शकतं महागात!

मोबाईल वापरकर्त्यांना अपुऱ्या माहितीची किंमत चुकवावी लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

लेझर शोसाठी वापरली जाणारी यंत्रणा अत्यंत तीव्र आणि गरम किरणे निर्माण करते. त्यांची तीव्रता सहन करण्याची क्षमता मोबाईल कॅमेऱ्यांची नसते.

सांगली : गणेश मंडळांच्या मिरवणुकीत (Ganpati Visarjan Miravnuk Sangli) साऊंड सिस्टिम, डीजे ठरवलाय आणि सोबतीला लेझर शोसुद्धा... साहजिकच, तरुणाईला आपल्या मंडळाच्या रंगारंग कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रिकरण करण्याचा मोह होतो. मात्र, हा मोह खिशाला कात्री लावणारा ठरत आहे.

लेझर शोचे चित्रिकरण करताना दहामागे किमान आठ कॅमेरे खराब झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मोबाईल दुरुस्ती स्टोअर आणि कंपनी सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्या दोन दिवसांत हे ग्राहक वाढले आहेत. मोबाईल कसा वापरावा, याबाबतचे प्राथमिक ज्ञान असलेल्या लोकांची संख्या अत्यंत कमी आहे.

हजारो रुपये किमतीचे मोबाईल (Mobile Camera) कसे जपावेत, याबाबत साक्षरता नाही. त्याचाच फटका यंदा गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात बसतो आहे. लेझर शोची किरणे अत्यंत तीव्र असतात. मोबाईल कॅमेरा ती सहन करू शकत नाही. त्याने थेट कॅमेऱ्याच्या ‘इमेज सेंसर’ला दणका बसतो. हा सेंसरच कॅमेऱ्याचे मुख्य कार्य करत असतो.

त्यामुळे कॅमेरा पूर्ण खराब होतो किंवा अंशतः काही अडचणी निर्माण होतात. त्यात दुरुस्तीची शक्यता कमी असते. अशा वेळी कॅमेरा बदलून घेणे, हाच पर्याय उरतो. अर्थातच, कॅमेऱ्याच्या किमतीच्या प्रमाणात कॅमेऱ्याची किंमत असते आणि ती हजारांच्या पटीतच असते. तेव्हा मोबाईल वापरकर्त्यांना अपुऱ्या माहितीची किंमत चुकवावी लागत आहे.

लेझर शोसाठी वापरली जाणारी यंत्रणा अत्यंत तीव्र आणि गरम किरणे निर्माण करते. त्यांची तीव्रता सहन करण्याची क्षमता मोबाईल कॅमेऱ्यांची नसते. एखादा फोटो घेतला तर अडचण होत नाही, मात्र सलग चित्रिकरण केल्यास कॅमेरा खराब होऊ शकतो. शक्यतो, थेट किरणांपुढे जाऊन चित्रिकरण करू नये.

- अजय नानवाणी, मोबाईल शोरूम मालक

जगातील टॉप ब्रँड असलेल्या कंपनीचा मोबाईल वापरतो. त्याने मिरवणुकीत व्हिडिओ चित्रिकरण करत असताना कॅमेरा खराब झाला. त्यावर उभ्या, आडव्या रेषा दिसत आहेत. फोटो काढणेही शक्य नाही. कॅमेरा बदलणे हाच पर्याय आहे.

- ओंकार पाटील, मिरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT