Ganesh Chaturthi 2024  esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2024 : आली गवर आली,सोनपावली आली; कधी आहे गौरी अवाहन, जाणून घ्या मूहूर्त

Gauri Avahan Muhurt : गौराईच्या मूर्तींना साडी नेसवली जाते. त्यांना भाजी भाकरी आणि पूरण पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. यंदा गौरी आवाहन कधी आहे आणि गौरी गणपती विसर्जन कधी आहे याबद्दल जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Chaturthi 2024 :

सर्वत्र गणपती बाप्पाचे उत्साहात स्वागत झाले आहे. गणपती बाप्पांनंतर गौरी आणि शंकर महादेव यांचे आगमन होते. काही वेळा गणपतीनंतर गौराई दोन दिवसांनी येते तर काही वेळा ती तीन दिवसांनी येते. गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी गणपती विसर्जन असे तीन दिवस महत्त्वाचे असतात.

यंदाचा गणेशोत्सव खास आहे कारण यावर्षी गौराई मंगळवारी येणार आहेत. मंगळवार हा देवीचा वार आहे त्यामुळे या दिवशी गौराईंचे आवाहन होणार आहे. हा एक दुर्मिळ योग मानला जात आहे.

सासरी गेलेली लेक जशी माहेरी येते. तसे गौराई आपल्या पतीसह माहेरी येते. महाराष्ट्रातील सर्वच गावांत वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचे पूजन केले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि परिसरात गौराई देवाधीदेव महादेवांसोबत येते. कराड-सातारा,सांगलीत गौराई बहीण गंगा सोबत येते. गौराई आल्यानंतर तिचे औंक्षण करून तिला घरात घेतले जाते. तिची यथासांग पूजा केली जाते.

गौराईच्या मूर्तींना साडी नेसवली जाते. त्यांना भाजी भाकरी आणि पूरण पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. यंदा गौरी आवाहन कधी आहे आणि गौरी गणपती विसर्जन कधी आहे याबद्दल जाणून घेऊया.

 कधी आहे गौरी अवाहन

यंदा जष्ठा गौरी अवाहन हे 10 सप्टेंबर रोजी आहे. गौरी पूजन 11 सप्टेंबर रोजी होईल तर घरगुती- गणपती विसर्जन 12 तारखेला म्हणजे गुरुवारी होईल.

गौरी अवाहनाचा मुहूर्त काय आहे

गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त १० सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे.

राहू काळ

दुपारी ३ ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

 

या दिवशी अनुराधा नक्षत्र पार पडणार आहे. अनुराधा नक्षत्राची सुरूवात ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून होईल. तर समाप्ती १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी होईल.

गौराईचे वेगळेपण

परंपरेप्रमाणे ज्येष्ठागौरींचा हा उत्सव साजरा करतात. काही लोक परंपरेप्रमाणे खड्याच्या गौरी आणून त्याचे पूजन करतात. तर काही मुखवट्याच्या गौरी पूजतात. तर काही गौरींची मूर्ती तयार करून तिची पूजा करतात. काही लोक प्रथेप्रमाणे तेरडा वनस्पतीची पूजा करतात.

खरी म्हणजे ही निसर्गाची पूजा असते. ज्येष्ठागौरी म्हणजे आदिशक्ती- पार्वतीची-गणेशमातेचीच पूजा असते. गौरीपूजनाच्या दिवशी सासरी गेलेल्या मुलीला माहेरी बोलावून तिला गोड जेवण देऊन ओटी भरतात. गौरीला परंपरेप्रमाणे खास जेवणाचा नैवेद्य करतात.

काही ठिकाणी अनेक भाज्यांचा नैवेद्य देवीला अर्पण करतात. गौरीपूजनाच्या दिवशी सायंकाळी महिलासाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. त्यावेळी महिला विशेष खेळही खेळतात. ज्येष्ठागौरींचा हा सण महिलांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT