Hartalika Vrat  esakal
Ganesh Chaturti Festival

Hartalika Vrat : हाच पती लाभो जन्मोजन्मी! मनोभावे करा हरतालिकेचे व्रत, जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी

हरतालिकेचे व्रत का केले जाते? काय आहे त्यामागील पौराणिक महत्त्व , जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Hartalika Vrat :  

हरतालिका व्रत हा अखंड सौभाग्य आणि इष्ट वर प्राप्तीसाठी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी दाम्पत्य जीवनासाठी हरतालिकेचे व्रत पाळले जाते. हरतालिका व्रत महाराष्ट्रात सर्वत्र पाळले जाते.

हरतालिका व्रताला सुद्धा पूजा साहित्याची आवश्यकता असते, त्याशिवाय हरतालिका व्रत पूर्ण होत नाही. यंदा हरतालिका तीज शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी आहे. माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप, तपश्चर्या आणि ध्यान केले. त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली.

हरतालिका पुजेसाठी लागणारे साहित्य

चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरांजन, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या किंवा तेलाच्या वाती विड्याची पाने, सुपारी, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने हे साहित्य पूजेला लागतात.

हरतालिका पूजा विधी

या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. घरामध्ये एका जागी चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर विडा मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

पूजेची मांडणी झाल्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.

यानंतर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने या पद्धतीने पत्री वाहतात.

दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते खावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून महिला उपवास सोडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT